

swt626.jpg
36884
दोडामार्गः हळबे महाविद्यालयात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना विवेकानंद नाईक, संदीप देसाई, प्रा. सुभाष सावंत आदी.
समाज विकासात पत्रकारांचे योगदान
विवेकानंद नाईकः दोडामार्गात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ : आद्यपत्रकार पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या कारकिर्दीत महान कार्य केले आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन इतिहास रचला पाहिजे. दोडामार्ग तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन उद्योजक विवेकानंद नाईक यांनी केले.
दोडामार्ग तालुका पत्रकार समिती व लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय यांच्यावतीने महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्री. नाईक बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रा. डॉ. एस. यू. दरेकर, डॉ. सोपान जाधव, प्रा. दिलीप बर्वे, प्रा. डॉ. प्रशांत ढेपे, डॉ. राजेंद्र इंगळे, रामकृष्ण मोरे, योगेश ठाकूर, पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास देसाई, सचिव गणपत डांगी, उपाध्यक्ष तेजस देसाई, खजिनदार रत्नदीप गवस यांसह वैभव साळकर, समीर ठाकूर, संदेश देसाई, लवू परब, लखू खरवत, महेश लोंढे, प्रशांत गवस आदी उपस्थित होते.
श्री. नाईक पुढे म्हणाले, ‘‘दोडामार्ग तालुक्यातील पत्रकार स्वतःला शाबासकी मिळावी म्हणून कोणतेही काम करत नाहीत. ते समाजासाठी काम करत असतात. त्यांच्या अशा पत्रकारितेमुळे तालुक्याची व जिल्ह्याची पत्रकारिता कीर्तिमान होत आहे.’’
प्रा. सावंत म्हणाले, ‘‘''जे न देखे रवी ते देखे कवी'' याप्रमाणे कोणालाही न दिसणाऱ्या समस्या नेहमी पत्रकारांना दिसत असतात. पत्रकार आपल्या लेखणीतून या समस्या समाजापुढे मांडत असतात. पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून त्यांना आर्थिक मदत, घरे देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. पत्रकारांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.’’
चौकट
पत्रकारांचा सन्मान
पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रा. सुभाष सावंत व विवेकानंद नाईक यांनी उपस्थित सर्व पत्रकारांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. पत्रकारांनी या सन्मानाबाबत महाविद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रास्ताविक सुहास देसाई यांनी केले. आभार शेफाली गवस यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.