

शिबिरातून ३५ हजार बाटल्या रक्त संकलन
नरेंद्राचार्य संस्थानतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व स्वस्वरूप सांप्रदयातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित महारक्तदान शिबिरात दोन दिवसात ३५ हजार ५०८ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. ४ ते १९ जानेवारी या कालावधीत विविध जिल्ह्यांत ९०० शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
अपघातामुळे किंवा दुर्धर आजारांमध्ये रुग्णांना कायम रक्ताची गरज असते. त्यासाठी रुग्णांना जीवनदान देणारी रक्ताची ही नितांत गरज लक्षात घेऊन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे हा महारक्तदानाचा संकल्प केला आहे. या विविध ठिकाणच्या शिबिरांमधील रक्त महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण अंतर्गत सर्व रक्तपेढ्या संकलित करणार आहेत. त्याचा उपयोग शासकीय रुग्णालयातील रुग्णांना होणार आहे. काल शनिवारी एका दिवसात ६ हजार २६७ रक्तबाटल्यांचे संकलन झाले आहे. संस्थानतर्फे रक्तदानासह अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे यंदा या रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. ज्या ज्या वेळी समाजाला रक्ताची गरज भासते त्या त्या वेळी संस्थानाने पुढाकार घेऊन रक्तसंकलन केले. त्यामध्ये मुंबई ११ हजार ३१३, कोकण ४ हजार ३७५, पश्चिम महाराष्ट्र ५,३४६, उत्तर महाराष्ट्र २,४६५, मराठवाडा ५,१३८, पश्चिम विदर्भ ६०३, पूर्व विदर्भ ४,८४४, तेलंगणा ३५०, गोवा ४२७, गुजरात ४९४, छत्तीसगड १०२, मध्यप्रदेश ५१ बाटल्या रक्त संकलन केले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.