नातू महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

नातू महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
Published on

नातू महाविद्यालयात
ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

चिपळूण ः मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात ‌वाचन संकल्प महाराष्ट्राचा‌ अंतर्गत वाचन पंधरवडा १५ जानेवारीपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने शुक्रवारी महाविद्यालयीन ग्रंथालयात अवांतर वाचन विषयाशी संबंधित ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथ हे गुरू असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज कमीत कमी एक तास ग्रंथालयात बसून वाचन करावे, असे आवाहन केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल अनिल कांबळे यांनी केले.
---
भरत खांबे यांना
एमडीआरटी बहुमान
गुहागर : तालुक्यातील पाचेरीसडा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एलआयसी महामंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एमडीआरटी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. गेली पाच वर्ष हा पुरस्कार ते प्राप्त करत आहेत. त्यांचा प्रामाणिकता, उच्च विचारसरणी आणि आर्थिक नियोजनाच्या १५ वर्षाच्या अनुभवाच्या आधारे ते हा पुरस्कार प्राप्त करत आहेत.
---
हातीव येथील मुलांना
शैक्षणिक साहित्य वाटप
साडवली : पत्रकारदिनानिमित्त देवरूखमधील पत्रकारांनी जिल्हा प्राथमिक शाळा गावठाण हातीव येथील ३५ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका रेश्मा जाधव, युगंधरा सुर्वे, प्रज्ञा पवार, नीलेश भोसले, पत्रकार सचिन मोहिते, नीलेश जाधव, सुरेश करंडे, सागर मुळ्ये, प्रमोद हर्डीकर उपस्थित होते.
---
चिपळुणात उद्या
युवकांसाठी प्रशिक्षण
चिपळूण : दी नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल एससी, एसटी हब सिंधुदुर्ग यांच्यावतीने एससी, एसटी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी शुक्रवारी ९ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शासकीय टेंडर प्रक्रिया कशी असते, टेंडर कसे भरावे, आपल्या प्रवर्गासाठी काय सवलती आहेत याबाबत माहिती देण्यात येणार आहे. केव्हीआयसीतर्फे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे कोणते व्यवसाय करता येऊ शकतात, त्यासाठी काय प्रक्रिया असते याबाबत माहिती दिली जाणार आहे. त्याच बरोबरीने उद्योग किंवा टेंडरिंग या प्रक्रियेत बँकेची भूमिका महत्वाची असते. त्यासाठी आपल्या जिल्ह्याची लीड बँक म्हणून बँक ऑफ इंडिया असल्याने त्याचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा उद्योगकेंद्रामार्फतदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिन मोहिते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com