

-rat७p३.jpg -
२५N३६९२१
संगमेश्वर ः रास्तभाव दुकान चालक-मालक संघटनेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी निवड झालेल्या रोशन शिंदे यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष अशोक कदम आणि अन्य पदाधिकारी.
समस्या सोडवण्याकरिता पाठपुरावा करू
अशोक कदम ः रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची निवड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः रास्त दराच्या धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या सोडवण्याकरिता कटिबद्ध आहे, असे आश्वासन रेशन दुकान चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम दिले.
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची कार्यकारणी निवड बिनविरोध करण्यात आली आहे. या सभेला संगमेश्वर तालुक्यातून ८० रेशन दुकान चालक, मालक उपस्थित होते. संगमेश्वर जाखमाता मंदिर येथे ही सभा झाली. या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. दुकानदारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर शासन आणि प्रशासन स्तरावर योग्य तो समनव्य साधून उपाययोजना करणे, संघटना मजबुतीकरण, सक्षमीकरण, अधिकारी वर्ग यांच्या सूचनेचे पालन आणि अंमलबजावणी तसेच दुकानदार यांची ग्राहकांप्रती कर्तव्य या विषयावर चर्चा झाली. या सभेला या अनेक दुकानदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. आरंभी रोशन शिंदे यांनी सभेचा उद्देश स्पष्ट केला. उपस्थित दुकानदारांनी चर्चेत सहभाग घेत आपापली मते नोंदवली आणि संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी बदलणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
संघटनेच्या अध्यक्षपदी रोशन शिंदे तर उपाध्यक्षपदी साखरपा भडकंबा येथील अतुल शिंदे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी संगमेश्वर येथील शंतनू शेट्ये, खजिनदारपदी संतोष खातू तर कार्यकारिणी सदस्यपदी नंदन भागवत, कल्पेश शिंदे, शरद सावरटकर, विलास ओकटे, महंमद दसुरकर, विलास सावंत, साधना सुर्वे, नम्रता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या सल्लागारपदी गंगाधर पंडित, लक्ष्मण पाचकले आणि मधुकर माने यांची निवड करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.