अभिजन - बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित

अभिजन - बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित
Published on

36962

अभिजन - बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित

कवी अजय कांडर : कणकवलीत पहिले साहित्य संगीत संमेलन

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : साहित्य - संगीतसह कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपली रसिकता सकारात्मक दृष्टीने विकसित करायला हवी. मात्र आपण अभिजन - बहुजन असा वाद करत बसलो तर या वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
शहरातील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पहिले साहित्‍य संगीत संमेलन झाले. यावेळी अध्यक्षपदावरून कवी कांडर बोलत होते. यावेळी
कवयित्री संध्या तांबे यांना साहित्यमित्र आणि गायिका नेत्रा पाचंगे प्रभू देसाई यांना मैत्री संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर चित्रकार सुमन दाभोलकर यांना मैत्री कला पुरस्कार दिला.
संमेलनाचे स्वागत अध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे, कविसंमेलन अध्यक्षा प्रमिता तांबे, संस्था पदाधिकारी सत्यवान साटम, वीरेश स्वामी, दीपक माने, राजू राऊत, संतोष कांबळे, सुनील आजगावकर, दिनेश डंबे, विठ्ठल चव्हाण, मंगेश आरेकर, मयुरी चव्हाण, अमर पवार , रमाकांत राणे, राजन धुरी, रेगेश धुत्रे, अभिषेक पेडणेकर, अवधूत सुतार , राजेंद्र चव्हाण, प्रशांत फोंडेकर आदी उपस्थित होते.
कवी कांडर म्‍हणाले की, ‘‘चांगली कविता आणि चांगली गीत रचना याचं नात धूसर असत. म्हणूनच चांगली कविता चांगलं गीत होतं आणि चांगलं गीत चांगली कविताही असण्याची शक्यता राहते. आपल्याकडे भावगीताची परंपरा समृद्ध असून मालती पांडे बर्वे, कृष्णा कल्ले, गजाननराव वाटवे अशा जुन्या जमान्यातील गायकांनी गायलेली भावगीते ही मूळ कविताच होती.’’
संगीत अभ्यास माधव गावकर म्हणाले की, ‘‘संगीताचा अभ्यास कधीच संपत नसतो. म्हणूनच आयुष्यभर संगीताचा विद्यार्थीच राहिलं पाहिजे. साहित्य संगीत संमेलन असे एकत्रित आयोजित करणे ही संकल्पना अभिनव असून ज्यांच्याबरोबर पूर्वी आम्ही काम केले, त्यांच्यासोबत या संमेलनाच्या निमित्ताने आता पुन्हा बसता आले याचा आनंद होतो. कलेच्या क्षेत्रात जी गोष्ट कष्टाने सिद्ध होते तीच गोष्ट टिकत असते. म्हणून कलेत कष्टाला दुसरा पर्याय नसतो.’’
संध्या तांबे म्हणाल्या, ‘‘साहित्य आणि संगीत कलेची एकत्रित पुरस्कार देण्याची कल्पना प्रेरणादायी आहे. आपण काम करताना आपल्या गुणवत्तेची कदर केली जाते, यासारखी चांगली गोष्ट दुनियेत कुठली नाही. साहित्य संगीत संमेलनाच्या आयोजकांनी मैत्र संगीत पुरस्कार देऊन जो सन्मान केला त्यामुळे कलाक्षेत्रातलं वातावरण निकोप आहे, यावरही विश्वास बसला आहे. यावेळी नेत्रा पाचंगे प्रभू देसाई, सुमन दाभोलकर या पुरस्कार विजेत्यांनी मनोगते व्यक्त केली. महेंद्र चव्हाण यांनी संमेलनामागील पार्श्वभूमी सांगितली.

रंगली गीत - कवितांची मैफल
संमेलनात विविध गीतांची मैफल झाली. यात सुजित सामंत यांनी संगीत संयोजन केलेली गाणी सविता सुतार, पूनम गुजर, विनायक सिद्धू, शिलवंत मयुरेश, प्रकाश मुणगेकर, श्रीधर पाचंगे यांनी सादर केली. तिसऱ्या सत्रात कवयित्री प्रमिता तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनात नामदेव गवळी, निशिगंधा गावकर, ऋतुजा सावंत-भोसले, मधुकर मातोंडकर, प्रगती पाताडे, प्रज्ञा मातोंडकर, योगिता शेटकर, मंगल नाईक जोशी, रीना पाटील, प्रियदर्शनी पारकर, सत्यवान साटम, विशाल मराठे, प्रा. आर.एन.हेदूळकर, श्रवण वाळवे, आर्या बागवे, संगीता पाटील, रीमा भोसले, नीलेश केरकर, ॲड. अर्चना गव्हाणकर, पल्लवी शिरगावकर, संतोष जोईल, किशोर कदम, धर्माजी जाधव, नरेंद्रकुमार चव्हाण, निकेत पावसकर, हर्षल तांबे, श्रवण वाळवे, वैष्णवी सुतार, रिया परब, समिक्षा चव्हाण, समिक्षा गोसावी आदींनी कविता सादर केली. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष भंडारे यांनी प्रस्तावना केली. मंगेश आरेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com