

swt74.jpg
36967
आचरा ः वाचन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.
आचऱ्यात वाचन स्पर्धेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ७ ः सतत वाचत राहिलो, तर आपल्याला वाचनाची गोडी निर्माण होते. वाचनाने भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. यासाठी पाठ्यपुस्तकांबरोबर कथा, जीवनचरित्र अशा प्रकारची पुस्तके वाचा, असे आवाहन काझी वाचनालयाचे सचिव जे. एम. फर्नांडिस यांनी वाचन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
आचरा येथील काझी वाचनालयात वाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत प्राथमिक शाळा गावुडवाडी व उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून तीन क्रमांक निवडून त्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.