असनियेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

असनियेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Published on

36968

असनियेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ७ ः असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला. यावेळी शालांत परीक्षेत शाळेतून दहावीत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या सायली गावकर, समृद्धी गावडे, स्नेहल गावडे यांच्यासह विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
प्रशालेतील यावर्षीचा आदर्श विद्यार्थी आर्यन गावडे आणि आदर्श विद्यार्थिनी तन्वी ठिकार यांना सन्मानपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात असनिये हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शैक्षणिक सुविधांसाठी ५० हजारांची देणगी दिली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष असनिये माजी सरपंच तथा धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वय समितीचे सदस्य एम. डी. सावंत, प्रमुख अतिथी सावंतवाडी एसपीके कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक दिलीप गोडकर, सुधीर सावंत, प्रशालेचे माजी शिक्षक तथा बांदा हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक रणधीर रणसिंग, शालेय समिती सदस्य रामा गावडे, कमलाकर सावंत, विजय सावंत, शरद सावंत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत आदी उपस्थित होते.
सावंत यांनी प्रशालेचा प्रवास उलगडून सांगताना विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. श्री. गोडकर यांनी, आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल आपली क्षमता वाढवावी लागेल, असे मार्गदर्शन केले. माजी शिक्षक रणधीर रणसिंग, सुधीर सावंत, मुख्याध्यापिका जान्हवी सावंत यांनी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. श्री. रणसिंग यांचा एम. डी. सावंत यांच्या हस्ते सन्मान केला. ज्येष्ठ शिक्षक राठोड यांनी अहवाल वाचनात प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्याध्यापिका सावंत यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक परेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. लिपिक जी. बी. सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com