

सौरभ कनावजे यांना
युवा प्रेरणा पुरस्कार
साखरपा : संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या साखरपा विभागाच्यावतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या वेळी येथील चित्रकार सौरभ कनावजे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीप्रित्यर्थ साखरपा विभाग पत्रकार संघाच्यावतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम साखरपा नं. १ केंद्रशाळेत झाला. पुरस्कार प्रदान केलेले चित्रकार कनावजे यांनी फाईन आर्टमधून पदवी घेतली आहे. त्यांची चित्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली आहेत. त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी गावातील आर्थिक दुर्बल घटकातील ग्रामस्थ अश्विनी जामदार यांना पत्रकारांतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. सरपंच प्रियांका जोयशी, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सुनील कांबळे, शिक्षक बाबासाहेब लाड आदींनी मनोगते सादर केली.
-------
वैयक्तीक माहिती शेअर
करणे टाळाः नागरगोजे
संगमेश्वर ः तारुण्यात मोबाईलद्वारे होणाऱ्या वेगवेगळ्या वापरामुळे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर तरुण मुला-मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना आपली वैयक्तीक माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचे टाळावे. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते, असे संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी सांगितले. संगमेश्वर, लोवले येथील नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये स्वसंरक्षण आणि सायबर गुन्हेगारीबाबत विशेष मार्गदर्शन उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, पोलिस बाबुराव खोंदल, कुणाल घोलप, होमगार्ड अभिषेक झेपले, प्राध्यापक प्रशांत जाधव, प्रा. स्नेहल खेराडे, नेहा सरवणकर आदी उपस्थित होते. त्यांनी पोलिस वापरत असलेल्या विविध शस्त्रांविषयी माहिती दिली.
-------
स्वाधार योजनेसाठी अर्ज
भरण्याची मुदत १५ पर्यंत
रत्नागिरी ः अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता २०२४-२५ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन भरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे. दहावी नंतरच्या अभ्यासक्रमांना व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी https://hmas.mahait.org पोर्टलवर ऑनलाईन राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.