

swt710.jpg
36998
पणदूर ः जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश मिळविलेल्या पणदूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत आप्पा गावडे, नागेंद्र परब व प्राध्यापक वर्ग.
विज्ञान प्रदर्शनामध्ये
पणदूर हायस्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पणदूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने दुहेरी यश संपादन केले. कनेडी हायस्कूल (ता. कणकवली) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गटात दीक्षा भिके हिने प्रथम, दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गटात शुभम राठोड याने तृतीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे विज्ञान शिक्षक आर. जी. कर्पे व श्री. लाड यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्था चेअरमन आपासाहेब गावडे, सचिव नागेंद्र परब, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय गावकर, पर्यवेक्षक एम. जी. कर्पे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे कौतुक केले.
...............
swt712.jpg
36999
भडगाव ः येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालयाच्या सभामंडप उद्घाटनप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, विद्यार्थी व शिक्षक वर्ग.
भडगाव विद्यालयाच्या
सभामंडपाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव (बु.) या विद्यालयाच्या सभामंडपाचे उद्टघान माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री. नाईक यांनी यासाठी आमदार १५ लाखांचा निधी दिला होता. यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, उपाध्यक्ष जनार्दन चव्हाण, संस्था सचिव संभाजी वळंजू, मुख्याध्यापक सचिन धुरी, संदीप सावंत, चंद्रहास सावंत, वर्दे सरपंच महादेव पालव, लालू सावंत, अतुल कल्याणकर, अरुण माळकर, विद्याधर मुंज, अमित कल्याणकर, किरण गावकर, सहायक शिक्षक सतीश वारंग, रामचंद्र पिकुळकर, माधुरी खराडे, सुप्रिया बांदेकर, आदिती परब, कविता राऊत, राजेंद्र सावंत, लक्ष्मण बावदाने, लक्ष्मण लोट, भार्गव सावंत, रेणुका खरात, आर्या कल्याणकर यांसह संस्थेचे पदाधिकारी, पांग्रड शाळेचे मुख्याध्यापक, भडगाव बु. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. सभामंडपाची गरज पूर्ण केल्याबद्दल श्री. नाईक यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.