

उदय रावणंग यांना पुरस्कार जाहीर
मनोज बावधनकर : दिव्यांगासाठीचे काम जिल्ह्यासाठी आदर्श
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ७ ः गेली २० वर्षे नावीन्यपूर्ण काम करत दिव्यांगांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी उदय रावणंग काम करत आहेत. त्याबद्दल गुहागर तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या स्व. सुभाष गोयथळे जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. स्व. वासुदेव गणेश निमकर आदर्श सरपंच या पुरस्कारासाठी दोन सरपंचांची निवड करण्यात येणार आहे. हे तिन्ही पुरस्कार गुहागर पोलिस मैदानात मोठा कार्यक्रम घेऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत देण्यात येतील, अशी माहिती गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांनी सांगितली.
पत्रकार दिनानिमित्त गुहागर तालुका पत्रकार संघाने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला पोलिस उपविभागीय अधिकारी राजमाने, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गटविकास अधिकारी केळस्कर, पोलिस निरीक्षक सचिन सावंत, तहसीलदार परिक्षित पाटील, नगरपंचायतचे अनंत मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, मेडिकल असोसिएशनचे डॉ. मंदार आठवले उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.