

37032
स्वतः जळून इतरांना प्रकाशमान करा
अॅड. देवदत्त परुळेकर ः बांद्यात ‘जनसेवा’तर्फे पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः जी माणसे जीवनभर जळत असतात, तीच पुढील जीवनात फुलत असतात. ज्यांना फुलायचे असते त्यांनी जळले पाहिजे. हे त्यांचे जळणे स्वतः व इतरांनाही प्रकाशित करते. अशा प्रकारचे जळण्याचे काम डॉ. द. भि. खानोलकर यांनी आपल्या जीवनात केले, असे उद्बोधन जनसेवा ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात साहित्य अभ्यासक अॅड. देवदत्त परुळेकर यांनी केले.
डॉ. द. भि. तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी संस्थेतर्फे दिलेल्या २०२४-२५ च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रशाळा बांदा नं. १ येथे सभागृहात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारप्राप्त विलास गोठोसकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांबळेवीर), आदर्श माध्यमिक शिक्षक मंगेश कांबळी (गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा), आदर्श समाजसेवक पुरस्कार रवी जाधव आणि सामाजिक बांधिलकी ग्रुप सावंतवाडी, गुरुवर्य वि. न. नाबर तथा तात्यासाहेब नाबर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त हनुमंत वाळके (शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव कणकवली), डॉ. अरविंद खानोलकर आदी उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पाच हजार देऊन गौरविण्यात आले. शालांत परीक्षेत विविध विषयांत उत्तुंग यश प्राप्त मुलांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित केले. तत्पूर्वी डॉ. खानोलकर यांच्या प्रतिमेस डॉ. मिलिंद खानोलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जनसेवा निधी बांदाचे संस्थापक सदस्य तसेच गुरुवर्य वि. न. नाबर स्मारक समितीचे अध्यक्ष कृष्णाजी वराडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गौरवी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. गुरुनाथ नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. मंदार कल्याणकर यांनी आभार मानले. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी मनोगते व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.