बकासूर बैलाला पाहण्यासाठी चिपळुणात गर्दी

बकासूर बैलाला पाहण्यासाठी चिपळुणात गर्दी
Published on

- rat७p२६.jpg-
P२५N३६९९२
चिपळूण : कृषी प्रदर्शनासाठी आलेल्या बकासूरला पाहण्यासाठी झालेली गर्दी.
-------------
‘बकासूर बैल’ कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

चिपळुणात आयोजन ; शेतकऱ्यांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ : चिपळुणात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून पशुधन प्रदर्शनाकडे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. राज्यात प्रसिद्ध बकासूर नावाच्या बैलाचे प्रदर्शनात आगमन झाले. त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळली. सुरक्षेच्या गराड्यात आलेला बकासूर प्रदर्शनात लक्षवेधी ठरला.
चिपळूण नागरी पतसंस्था व वाशिष्ठी मिल्कच्यावतीने पाच दिवस चिपळुणातील सावरकर मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्‍या दिवशी देखील सकाळी चिपळूण व जिल्हाभरातील लोकांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. विविध प्रकारच्या बैलगाड्यांचे प्रसिद्ध बैल, गजा रेडा, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी, गायी या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहेत. याशिवाय उंट, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पक्षी, शोभेचे उंदीर लोकांचे आकर्षण ठरत आहेत. पाच पायांची गायदेखील या प्रदर्शनात आहे. या शिवाय या ठिकाणी केलेले कोकणी घर, गोठा, मचाण लक्ष वेधून घेत आहे.
रविवारी सायंकाळी वारकऱ्‍यांनी महोत्सवात रिंगण धरले आणि विठ्ठल नामाचा गजर केला. त्यानंतर पशुधन स्पर्धा झाली. त्यानंतर आयोजकांतर्फे चिपळुणातील पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. महोत्सवात पशुधन स्पर्धाही घेण्यात आली. ९ जानेवारीपर्यंत प्रदर्शनामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com