बांदा नट वाचनालयात सावित्रीबाई फुलेंना वंदन

बांदा नट वाचनालयात सावित्रीबाई फुलेंना वंदन
Published on

37117

बांदा नट वाचनालयात
सावित्रीबाई फुलेंना वंदन

बांदा, ता.७ ः येथील नट वाचनालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अनंत भाटे यांनी सावित्रीबाईंच्या महान कार्याची माहिती सांगितली. संचालक शंकर नार्वेकर यांनीही आपले विचार मांडले.
वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, महिला सदस्या स्वप्निता सावंत तसेच वाचक व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी ''वाचन संकल्प महाराष्ट्राचा'' अंतर्गत वाचनसंवाद व बालसाहित्य ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले. त्यावेळी शालेय मुलांचा पुस्तक वाचन कार्यक्रम घेण्यात आला. वाचनाशिवाय तरणोपाय नाही, असे उद्‌गार सदस्य प्रकाश पाणदरे यांनी काढले.
वाचनालयाचे अध्यक्ष सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सहकार्यवाह मोर्ये, सदस्य नार्वेकर, प्रकाश पाणदरे, स्वप्निता सावंत, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, उपशिक्षक जे. डी. पाटील, अंकुश माजगावकर, अर्चना सावंत तसेच प्रशालेचे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार सचिव राकेश केसरकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com