

37035
‘सकाळ’ने आवाज उठवला
अन् कचऱ्याचा ढिग हटला
बांद्यातील समस्येची ‘महामार्ग’कडून दखल
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः येथील बसस्थानकासमोर महामार्गालगत असलेला कचऱ्याचा ढिगारा आज हटविण्यात आला. ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी कचरा उचलण्याच्या सूचना महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या.
गेले कित्येक दिवस याठिकाणी कचऱ्याचा ढिगारा रस्त्यालगत ठेवण्यात आला होता. याचा त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना नेहमीच होत होता. हा कचऱ्याचा ढिगारा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत होता. ‘सकाळ’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करताच याची दखल घेत महामार्ग विभागाने तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने हा कचऱ्याचा ढिगारा हटविला. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.