

लांजात तीन प्रभाग पाण्याविना
पाईपलाईन फुटली : नागरिकांची गैरसोय
लांजा, ता. ७ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात पाईपलाईन फुटल्याने गेल्या चार दिवसांपासून लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ४, ८ आणि ९ मध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक व शिवसैनिकांनी मंगळवारी महामार्ग ठेकेदार कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
शहरातील तीनही प्रभागांत गेले पाच दिवस पाणी नसल्या कारणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक स्वरूप गुरव, राजेश हळदणकर, पदाधिकारी सचिन लिंगायत, नितीन शेट्ये व इतर पदाधिकारी यांनी श्रीराम पूल येथे जाऊन हायवेच्या कामांमध्ये तुटलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणी जाऊन आक्रमक भूमिका घेतली. गेले चार दिवस अर्ध्या लांजा शहरामध्ये पाणीपुरवठा बंद असूनही ठेकेदार कंपनीकडून अद्याप काम सुरू नसल्याने आक्रमक होत अधिकाऱ्यांना जागेवर बोलून त्यांना जाब विचारत तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली.
त्यानुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, काम चालू करण्याच्या मागणीनंतर कंपनीकडून कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये मुख्याधिकारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी ठेकेदार कंपनीसोबत चर्चा करून यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.