एनसीडीसीच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली

एनसीडीसीच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली
Published on

37069

एनसीडीसीच्या माध्यमातून निलक्रांती अधिक प्रभावशाली
डॉ. प्रकाश शिंगारेः मत्स्य महाविद्यालयात मच्छीमारांसाठी कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः मत्स्य शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेवून आपल्या संस्थेचे बळकटीकरण आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांनी केले.
लक्ष्मणराव इनामदार नॕशनल अकॅडमी फोर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन.सी.डी.सी. पुणे, सहकार मंत्रालय, मत्स्यव्यवसाय विभाग आणि मत्स्य महाविद्यालय यांच्यावतीने संस्थेच्या परिषद दालनात मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत आयोजित कार्यशाळेला प्र. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आनंद पालव, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय डॉ. प्रकाश शिंगारे, प्रोफेसर आणि हेड फिशरीज कॉलेज डॉ. नितीन सावंत, डॉ. केतन चौधरी, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण उपस्थित होते. मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे, या संदर्भात सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी शिवराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

कोट
केंद्राच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील मच्छीमार हा खोल समुद्रातील मासेमारी करण्यास १२ ते २०० समुद्र मैलांपर्यंत मासेमारीकरिता जाऊ शकतो अशी माहिती दिली. ड्रोनचा आधार घेऊन बेकायदेशीर मासेमारी टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मत्स्य शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य शेतकऱ्यांनी करावा.
- आनंद पालव, प्र. सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com