मोती तलावात सहा पॅडल बोटी दाखल

मोती तलावात सहा पॅडल बोटी दाखल
Published on

37084

सहा पॅडल बोटी
मोती तलावात दाखल

सावंतवाडीत पर्यटनात भर; ‘चांदा ते बांदा’तून सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः येथील ऐतिहासिक मोती तलावाला आणखी शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेंतर्गत पर्यटनवृद्धीसाठी मोटार, स्पीडबोटसह बदकाचा आकार असलेल्या सहा मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात. यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधिक भर पडत असून, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांसाठी हे खास आकर्षण असणार असून शहरवासीयांना देखील वेगळा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चांदा ते बांदा योजनेतून पहिल्या टप्प्यात एक मोटर बोट व एक स्पीड बोट यापूर्वी दाखल झाली होती. आता यात मॅन्युअल पॅडल बोटी दाखल झाल्या असून, दोन आसनी ३ व सहा आसनी ३ अशा सहा बोटींचा समावेश झाला आहे. माजी मंत्री तथा चांदा ते बांदा योजनेचे अध्यक्ष आमदार केसरकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आमदार केसरकर यांनी पर्यटनासाठी जाहीर केलेल्या पूरक उपक्रमांना सुद्धा यामुळे चालना मिळणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाची उत्सुकता सावंतवाडीकरांना लागली असून सायंकाळी अबालवृद्धांनी या बोटी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
--
लवकरच होणार लोकार्पण
दरम्यान, चांदा ते बांदा योजनेतून या बोटी मंजूर करण्यात आल्या आहेत. लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून बोटिंग क्लब पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com