

38290
क्रिकेट स्पर्धेत इस्वटी स्पोर्टस विजेता
सोनुर्ली प्रीमियर लीग ः टायगर ग्रुप संघ ठरला उपविजेता
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ः नवयुवक कला, क्रीडा मंडळ सोनुर्ली आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत इस्वटी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकाविले. टायगर ग्रुप संघ स्पर्धेचा उपविजेता ठरला.
नवयुवक कला, क्रीडा मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ''सोनुर्ली प्रीमियर लीग-पर्व सातवे'' या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत इस्वटी स्पोर्ट्स (मालक भूषण ओटवणेकर), क्रेझी इलेव्हन (संघमालक नवीन गावकर), टायगर ग्रुप (संघमालक बिट्टू नाईक), कमळेश्वर स्पोर्ट्स (संघमालक विनायक गावडे), यंग स्टार बॉईज (संघमालक मुन्ना जाधव) व भवानी स्पोर्ट्स (संघमालक मुरली हिराप) या सहा संघांनी सहभाग दर्शविला. शनिवार व रविवार असे दोन दिवस चाललेली ही स्पर्धा अतिशय चुरशीची झालेली पाहायला मिळाली. सर्व संघांनी स्पर्धेतील सामन्यांदरम्यान उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले; परंतु या स्पर्धेत इस्वटी स्पोर्ट्स संघ विजेता ठरला. स्पर्धेचा अंतिम सामना हा इस्वटी स्पोर्ट आणि टायगर ग्रुप या संघांमध्ये पार पडला. या सामन्यात इस्वटी संघाने ठेवलेल्या धावसंख्येचे आव्हान टायगर स्पोर्ट संघाला पेलले नाही. त्यामुळे इस्वटी संघ विजेता ठरला, तर टायगर स्पोर्ट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामना पाहण्यासाठी मैदानावर मोठ्या संख्येने क्रिकेटर रसिकांची गर्दी जमली होती.
बक्षीस वितरण सोनुर्ली गावचे प्रमुख मानकरी रमेश गावकर, मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मंडळाकडून स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.