Narayan Rane On Chipi Airport
Narayan Rane On Chipi AirporteSakal

Chipi Airport : चिपी विमानतळाला कुलूप मारूनच दाखवा : नारायण राणेंचे आव्हान

Sindhudurg growth through tourism : पर्यटनातून सिंधुदुर्गचा आर्थिक विकास घडविणार असल्याचे नारायण राणेंचे प्रतिपादन
Published on

कणकवली : चिपी विमानतळाला कुलूप ठोकणार, अशा धमक्‍या काही लोक देत आहेत. ‘टाळे मारूनच दाखवा; नाही, तुझ्या घराला टाळे मारले तर नाव सांगणार नाही, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. यावेळी त्‍यांनी पर्यटनातून सिंधुदुर्गात आर्थिक विकास घडवून आणू, असा विश्‍वासही व्यक्‍त केला.

कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा समारोप उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात झाला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वैभव नाईक दोन दिवसापूर्वी चिपी विमानतळावरील सेवा पूर्ववत न झाल्यास विमानतळाला ताळे ठोकण्याचा इशारा दिला होता, याला खासदार राणे यांनी प्रत्युत्तर दिले. या कार्यक्रमप्रसंगी मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, संदेश सावंत, समीर नलावडे, बंडू हर्णे, अबिद नाईक, अण्णा कोदे उपस्थित होते.

णे म्‍हणाले, ‘‘चिपी विमानतळ हा तांत्रिक कारणास्तव बंद आहे. तो लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या मुद्द्यावर राजकारण करून विरोधक प्रसार माध्यमातून विमानतळाला टाळे ठोकण्याच्या धमक्‍या देत आहेत. चिपी विमानतळाच्या मुद्द्यावर आता कोणी बोलला तर मी त्‍याला सोडणार नाही. घरात, दारात येऊन उभा राहणार. पुढचे मला माहीत नाही. मी पोलिसांना सांगतो की, विमानतळाला कुणी टाळे ठोकण्याचा इशारा देत असेल त्‍यावर गुन्हे नोंदवा.’’

Narayan Rane On Chipi Airport
आणखी एक Airport तयार! नवी मुंबई विमानतळ आकाशात 'अधिराज्य' गाजवण्यास सज्ज, पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग

ते पुढे म्‍हणाले, ‘‘टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना एकदा प्रत्यक्ष पहावे यासारखा दुसरा आनंद नाही. माझ्या जिल्हावासीयांनी कलेचा आनंद लुटावा म्हणून सिंधु पर्यटन महोत्सव सुरू केला. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सिंधुदुर्गात यावी, यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. सी वर्ल्ड निश्चितणे होणार आहे, वैभववाडी कोल्हापूर रेल्‍वे मार्गही आम्‍ही पूर्णत्‍वास नेणार आहोत. याखेरीज प्रत्येक घरात रोजगार देणार हा माझा निर्धार आहे. दोडामार्गमध्ये १२०० एकरमध्ये हजारो कारखाने उभारण्याचा संकल्प आहे. १९९० पासून मी राजकारणात आहे. मागील ३५ वर्षात अनेक अनुभव घेतले. माझ्या जिल्ह्यातील माणसे चांगलीच असतील. पण, काही वाईट अपवाद आढळले आहेत.’’

माजी नगराध्यक्ष नलावडे यांनी, सिंधुदुर्गात पर्यटन महोत्सव ही संकल्पना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची आहे. त्यांच्या प्रेरणेतून मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून कणकवली पर्यटन महोत्सव आयोजित केला. मंत्री नितेश राणे यांच्या आशीर्वादाने याहीपूढे मोठे कलाकार कणकवली पर्यटन महोत्सवात येतील. कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गायक पवनदीप राजन आणि अरुनीता कांजीलाल, चेतना भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.

नितेश राणे नक्कीच विकास साधणार

कणकवली मतदारसंघात ५९ हजारांच्या मताधिक्याने नितेश राणेंना विजयी केलात. तुमचे उपकार मंत्री नितेश विसरणार नाही. कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास मंत्री नितेश राणे करणार यात शंका नाही. साधी बालवाडी काढू शकले नाहीत ते विरोधक आम्हाला मिडीयातून धमकी देतायत. अडीच वर्षे सत्ता असताना ठाकरे शिवसेनेने कायम तोडपाणी करण्यासाठी विरोध केला. आता सत्ता आमची आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाचा विकास झाल्‍याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com