ःराजापुरात लवकरच मोठा उद्योग आणू
राजापुरात लवकरच मोठा उद्योग आणू
किरण सामंत ः रोजगार विषयाला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८: अरबी समुद्राच्या किनाऱ्यापासून सह्याद्रीच्या टोकापर्यंत पसरलेला राजापूर, लांजा, साखरपा हा एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. मागील अनेक वर्षापासून हा मतदार संघ विकासापासून वंचित आहे. पुढील ५ वर्षात राज्यातील विधानसभा मतदार संघांपैकी मॉडेल मतदार संघ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी रोजगार या विषयाला प्राधान्य देऊन एक मोठा उद्योग आणून कायापालट करू, असे मत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत व्यक्त केले. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेवेळी ते बोलत होते.
राज्यात ज्या मतदार संघांचे प्रतिनिधित्व मंत्री करत आहेत त्या मंत्र्याचे मतदार संघ विकसित झाले आहेत; मात्र राजापूर- लांजा मतदार संघ अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत राहिला आहे. त्यामुळे राज्यातील मॉडेल मतदार संघ म्हणून हा मतदार संघ विकसित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
विशेषत: अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांची कामे अर्धवट आहेत. रस्ते, आरोग्य, शाळा हे प्रश्न आहेतच; परंतु महत्वाचा रोजगाराचा प्रश्न मतदार संघाला भेडसावत आहे. रोजगारासाठी येथील तरुण पिढी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांना जवळ करत आहेत. त्यामुळे येथील तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी राज्यातील सर्वात मोठा उद्योग राजापूर-लांजा मतदार संघात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतरच आपण तो जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक विकासकामे ही नुसती पत्रे देऊन होत नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. कामे वेळेवर का होत नाहीत हेही पाहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

