कार्डियाक सर्जरी शिबिरात ४ बायपास शस्त्रक्रिया

कार्डियाक सर्जरी शिबिरात ४ बायपास शस्त्रक्रिया
Published on

rat१७p८.jpg -
२५N३९२४२
खेड ः थोराकोटॉमी हृदय शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांसह वालावलकर रुग्णालयाचे वैद्यकीय पथक.

‘कार्डियाक शिबिरा’त चार हृदय शस्त्रक्रिया
वालावलकर रुग्णालय ; जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : येथील वालावलकर रुग्णालयात झालेल्या कार्डियाक सर्जरी शिबिरात चार बायपास, एक हृदयाची झडप बदलण्याची आणि एक थोराकोटॉमी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
वालावलकर रुग्णालयात आलेल्यासर्व रुग्णांची डॉ. प्रणव श्यामराज यांनी अॅंजिओग्राफी केली. त्या रुग्णांच्या हृदयाच्या तीनही रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळून आल्या होत्या. अशा रुग्णांना बायपास शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. म्हणून ४ रुग्णांवर वालावलकर रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका रुग्णाला झडपेचा आजार होता. हृदयाची झडप व्यवस्थित उघडझाप करत नव्हती. तिला सूज आली होती. त्यामुळे या रुग्णाची झडप काढून कृत्रिम झडप बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सहाव्या रुग्णाच्या छातीवर झाड पडलेले होते. त्याच्या छातीला मार लागलेला होता. रुग्णाने १० ते १५ दिवस घरीच घरगुती उपचार केले; परंतु १५ दिवसानंतर त्याला छातीत दुखायला लागले, दम लागू लागला, ताप येऊ लागला म्हणून रुग्णाला वालावलकर रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. वालावलकर रुग्णालयात तापसण्या नंतर रुग्णाच्या छातीत पू झालेला आहे. तो पू फुप्फुसाला व हृदयाला इजा झाली होती. त्यामुळे फुप्फुस आकुंचन झाले होते आणि पु हृदयापर्यंत पोचला होता. या रुग्णाची थोराकोटॉमी शस्त्रक्रिया केल्याने रुग्ण बरा झाला. सर्व शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आल्या.
---
हे वैद्यकीय अधिकारी झाले सहभागी
शिबिरासाठी डॉ. राजीव गोडबोले (कार्डिओथोरॅसिक सर्जन) यांच्यासह डॉ. अभिषेक पोतनीस (कार्डिओथोरॅसिक सर्जन), डॉ. सचिन वैष्णव (कार्डियाक अनेस्थेटिक), सुरेश काळे ( परफुजिनस्ट), ऑपेरेशन थिएटर सिस्टर सुषमा गुरव, आयसीयू सिस्टर कविता कदम, समीक्षा कळंबे, विकास म्हसकर सहभागी झालेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com