चक्रभेदी संस्थेतर्फे महिलांमध्ये जागृती
-rat१७p१६.jpg
२५N३९२७०
ः साखरपा : चक्रभेदी जाणीव जागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैदेही सावंत.
---------
चक्रभेदी संस्थेतर्फे महिलांमध्ये जागृती
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १८ : महिला जाणीव आणि जागृती याबाबत साडवली येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. महिला स्नेही आणि बालस्नेही या संकल्पनेविषयी वैदेही सावंत यांनी मार्गदर्शन केले.
शासनाने समाज सक्षमीकरणासाठी मांडलेल्या नऊ संकल्पनांपैकी महिलास्नेही आणि बालस्नेही या दोन संकल्पना आहेत. महिला आणि बालकांना सक्षम आणि प्रगतिशील बनवण्यासाठी या संकल्पनांमधून प्रयत्न केले जातात. या संकल्पनांची माहिती साडवली येथील एका कार्यक्रमात यशदा प्रशिक्षक वैदेही सावंत यांनी महिलांना करून दिली. महिलांच्याबाबतीत आजही सुरू असलेल्या अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, अशी अपेक्षा सावंत यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमाला गौरी गोखले, सायली त्रिभुवने, सीमा भोजने, रिया सासवडे, शिक्षिका माही पवार, मनीषा घोडे, रंजना गुरव, अर्पिता धने, श्रुतिका गुरव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

