सिद्धीयोग महाविद्यालयाचा दिक्षांत सोहळा उत्साहात

सिद्धीयोग महाविद्यालयाचा दिक्षांत सोहळा उत्साहात

Published on

सिद्धयोग महाविद्यालयाचा
दीक्षांत सोहळा उत्साहात
खेड ः सिद्धयोग विधी महाविद्यालयामध्ये वकील होऊन बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचचा दीक्षांत समारंभ सोहळा उत्साहात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाला सुप्रिम कोर्टाच्या अधिवक्ता अॅड. अनिता बाफना, संभाषण व संवाद तज्ज्ञ अभिषेक बोंद्रे, संस्थेचे खजिनदार काशिराम सकपाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमांगी पोळ, प्राचार्या प्रीती बोंद्रे उपस्थित होते.
---
गोविंदराव निकमांना
आदरांजली
सावर्डे ः गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांची ९० वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या हस्ते स्व. गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. निकम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे स्मृतीगंध भित्तीपत्रक गौरी शितोळे व गणेश बागवे यांनी तयार केले होते. त्याचे अनावरण प्राचार्य वारे यांच्या हस्ते करण्यात आले.
---
‘स्वामीनारायण धाम’चे
भरणेत आज भूमिपूजन
खेड ः खेड शहरानजीक भरणे गावाच्या हद्दीत पाटीदार भवनजवळच्या नियोजित जागेत बीएपीएस स्वामीनारायण संस्कार धाम मंदिराचे भूमिपूजन रविवारी (ता. १९) होणार आहे. या अनुषंगाने खेड पाटीदार भवन जवळील नियोजित जागेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातून खेड येथील मंदिरासाठी भाविक सहभागी होणार आहेत. १९ जानेवारीला सकाळी ९.३० वा. कोठारी स्वामी यांच्या हस्ते गृहराज्य मंत्री योगेश कदम व अनेक संतांच्या उपस्थितीत शीलापूजन व महापूजा होईल.
---------
२४ थकबाकीधारांवर
खेडमध्ये कारवाई
खेड ः नगरपालिकेने थकित पाणीपट्टीधारकांविरोधातील कारवाईची मोहीम गतिमान केली आहे. २४ थकबाकीधारकांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. आठवडाभरात एकूण ४९ जणांना दणका देण्यात आला आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेतील पाणी विभागाच्या पथकाने आठवडाभरापूर्वीच थकित पाणीपट्टीधारकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगर पालिकेच्या पाणी विभागातील उमेश रेपाळ, पाणीपुरवठा अभियंता अक्षय लोहार, प्रणित जाधव, राजेश खेडेकर, मुकेश पेवेकर, सुनील पिलदणकर, सुयोग शिर्के, निखिल यादव पथकांमार्फत आदींच्या थकितदारांच्या नळजोडण्या तोडण्यात येत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com