सहकारी संस्थांना शक्ती देण्याचे काम शासन करतेय

सहकारी संस्थांना शक्ती देण्याचे काम शासन करतेय

Published on

rat17p5.jpg
39238
लांजाः गवाणे येथील कार्यक्रमात बोलताना जयवंत विचारे.
-------------
शासनाकडून सहकारी संस्थांना
शक्ती देण्याचे काम ः विचारे
गवाणेत सहकार भारतीचा स्थापना दिन
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १८ ः सहकार भारतीच्या प्रयत्नातून प्रथमच कृषी मंत्रालयाधीन असलेले सहकार खाते स्वतंत्र करून त्यासाठी नव्याने सहकार मंत्रालय तयार केले आहे. पुढील काळात ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांना शक्ती देण्याचे काम शासन करत आहे, असे प्रतिपादन आर. के. पी. काजूचे अध्यक्ष व सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयवंत विचारे यांनी केले.
सहकार भारती या देशव्यापी संघटनेचा ४७ वा स्थापना दिन कार्यक्रम गवाणे येथील रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेत येथे आयोजित केला होता. याप्रसंगी जयवंत विचारे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या वेळी गवाणे विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद करंबळे, आयएलआरटी संघटनेचे चिन्मय घुले, ब्रिस्कव्हरी प्रा. लि.चे संतोष कुमार उपस्थित होते.
मुकुंद करंबळे म्हणाले, ‘लवकरच संस्थेसाठी जमीन खरेदी करून स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. ग्रामस्थांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, शासनाने रुपये १.५ लाखांचे संगणक दिले आहेत. परिणामी, ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com