वाहनांना सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवा
वाहनांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवा
अजित ताम्हणकर ः वाहनांची ओळख पटवणे शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः वाहन क्रमांकामध्ये छेडछाड व बनावटगिरी करत असल्याचे गुन्हे कमी करणे, वाहनांची ओळख पटवणे व राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन सर्व वाहनांनी हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याकरिता रिअल मेझॉन इंडिया ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसवण्याची तरतूद केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याकरिता रिअल मेझॉन इंडिया ही एजन्सी निश्चित केली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याकरिता बुकिंग पोर्टल https://hsrpmhzone२.in वर सोयीप्रमाणे वाहनधारकांनी अपाईंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी. रत्नागिरी कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरीही काही कामानिमित्त रत्नागिरीमध्ये वाहन वापरत असेल तर एचएसआरपी नंबर बसवणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याकरिता जीएसटी वगळून पुढीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. दुचाकी व ट्रॅक्टर- ४५० रुपये, तीनचाकी ५०० रुपये आणि इतर सर्व वाहनांना ७४५ रुपये.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

