निर्यातक्षम आंबा उत्पादनाकडे लक्ष द्यावे

निर्यातक्षम आंबा उत्पादनाकडे लक्ष द्यावे

Published on

39405

निर्यातक्षम आंबा उत्पादनाकडे लक्ष द्यावे
दीपाली माळी : जामसंडेत ‘हापूस आंबा उत्तम कृषी पद्धती’वर प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ः भविष्यातील शेती उत्पादन वाढीसाठी बागायतदार शेतकऱ्यांनी निर्यातक्षम आंबा उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. उपलब्ध शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगाकडेही वळले पाहिजे, असे मत नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापिका दीपाली माळी यांनी जामसंडे येथे व्यक्त केले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल निर्यात झाल्यास त्यातून आर्थिक उन्नती साधणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये सहकार व पणन विभागांतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत राज्य सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हापूस आंबा उत्तम कृषी पद्धती’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‌घाटनावेळी श्रीमती माळी बोलत होत्या. मंचावर माळी यांच्यासह जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, ऋषिकेश उलपे, तुषार जंगम, योगेश शिंदे, संदेश पिसे, अनंत बंगाल, हेमंत जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बडे यांनी, आंबा निर्यातीसाठी आवश्यक असणारी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासित केले. श्री. जंगम यांनी, मॅग्नेट प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकरी उत्पादकांनी प्रकल्पाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रामेश्‍वर आंबा संशोधन उपकेंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अजय मुंज यांनी, आंबा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
मुळदे येथील सहयोगी अधिष्ठाता पी. सी. माळी यांनी, निर्यातक्षम आंबा उत्पादन आदर्श व्यवस्थापन पद्धती’ या विषयावर तर महेश शेडगे यांनी, आंबा प्रक्रिया उद्योगातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. निशिकांत पाटील यांनी, आंबा मार्केटिंग तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. तर लिंग समानता व सामाजिक समावेशन याविषयी संदेश पिसे यांनी माहिती सांगितली. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले होते. आभार हेमंत जगताप यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com