भंडारी, जय गणेश, वराडसह काळसे हायस्कूल संघ विजयी

भंडारी, जय गणेश, वराडसह काळसे हायस्कूल संघ विजयी

Published on

भंडारी, जय गणेश, वराडसह काळसे हायस्कूल संघ विजयी
मालवणात लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा; विलास बांदिवडेकर स्मरणार्थ आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : श्रीमती मिथिला विलास बांदिवडेकर व कुटुंबीय, रुईया नाका मित्र मंडळ, ९/९७ ग्रुप यांच्या सहकार्याने व जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित विलास बांदिवडेकर स्मरणार्थ शालेय १७ वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी भंडारी हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, वराड हायस्कूल, काळसे हायस्कूलच्या संघांनी विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सामन्यात भंडारी हायस्कूल संघाने आठ षटकांत एक गडी गमावून ६६ धावा केल्या. यात वैभव पवार १९ धावा, भुवन सारंग १९ धावा, निहाल पाटकर १० धावांचे योगदान दिले. वराड हायस्कूलचा संघ अवघ्या १९ धावांत गारद झाला. भंडारी हायस्कूलच्या पारस मेस्त्रीने पाच गडी बाद केले. हा सामना भंडारी हायस्कूलने ४७ धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून ७५ धावा केल्या. यात पियुष वस्त २०, सोहम भगत ८ धावा केल्या. कन्याशाळा संघाच्या कृष्णा खोरजे याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कन्या शाळा संघ ७ षटकांत ३८ धावा करू शकला. जय गणेश संघाच्या तेजस मेस्तने २ गडी बाद केले. ३७ धावांनी जय गणेश संघाने हा सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात वराड हायस्कूल संघाने ८ षटकांत ३ गडी गमावून ४४ धावा केल्या. यात ओंकार चव्हाण १४, श्लोक चव्हाण याने ९ धावा केल्या. त्रिंबक संघाच्या वेदांतने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना त्रिंबक हायस्कूलचा संघ सर्व गडी गमावून ३७ धावा करू शकला. सूरज पिळणकर याने ११ धावांचे योगदान दिले. वराड हायस्कूल संघाने ७ धावांनी हा सामना जिंकला. चौथ्या सामन्यात जय गणेश संघाने ८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ६५ धावा केल्या. यात तेजस मेस्तने १६, आदित्य वाक्करने ७ धावा केल्या. काळसे हायस्कूलच्या दत्ताराम याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना काळसे हायस्कूलचा संघ सर्व गडी गमावून ३४ धावा करू शकला. आदित्य वाक्करने ३ गडी बाद केले. जय गणेश संघाने ३२ धावांनी हा सामना जिंकला. पाचव्या सामन्यात भंडारी हायस्कूल संघाने ८ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १०० धावा केल्या. यात निहाल पाटकर ३० धावा, यशवंत परब २१ धावा, वैभव पवारने २५ धावा केल्या. त्रिंबक संघ ८ षटकांत २१ धावा करू शकला. भंडारी हायस्कूलच्या पारस मेस्त्रीने ३ गडी बाद करत संघास ७९ धावांनी विजय मिळवून दिला. सहाव्या सामन्यात काळसे संघाने ८ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात ७७ धावा केल्या. यात आशिष येळेकरने २३ धावा, हर्ष परबने १० धावा केल्या. कन्या शाळा संघ सर्व गडी गमावून केवळ २७ धावा करू शकला. काळसे संघाच्या हर्ष परबने ३ गडी बाद केले. काळसे संघाने ५० धावांनी हा सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com