देवस्थान समिती कारभाराबाबत जाचक अटींविरोधात इशारा
39467
देवस्थान समिती कारभाराबाबत
जाचक अटींविरोधात इशारा
२६ पासून उपोषण : सावंतवाडी समिती
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहतानाच्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अनेकवेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येत्या आठ दिवसांत याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास २६ जानेवारीपासून देवस्थान समितीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व देवस्थानचे मानकरी आणि उपसमितीचे पदाधिकारी साखळी उपोषणास बसणार असल्याचा इशारा सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने शुक्रवारी देवस्थान समितीला एका निवेदनाद्वारे दिला.
सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची बैठक शुक्रवारी (ता. १७) सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजवाड्यात झाली. सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस्य कृष्णा उर्फ जीजी राऊळ (माडखोल), पंढरीनाथ राऊळ (सांगेली), चंदन धुरी (कोलगाव), सुभाष गावडे (चौकुळ), मधुकर देसाई (डेगवे,) विलास सावंत (डिंगणे), लक्ष्मण परब (चराठा), वसंत धुरी (सातोसे) आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

