

swt189.jpg
39499 39499
खारेपाटण : महाविद्यालयाला नॅक कमिटीकडून ‘बी’ श्रेणी प्राप्त झाली. (छायाचित्र : एन. पावसकर)
खारेपाटण महाविद्यालयाला ‘बी’ श्रेणी
‘नॅक’चे मानांकनः शैक्षणिक दर्जा, सुविधांमध्ये २.३२ गुण
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : यू.जी.सी संचलित नॅशनल असेसमेंट अँन्ड अँक्रिडिएशन काऊंसिल (नॅक) द्वारे खारेपाटण महाविद्यालयाला ‘बी’ मानांकन मिळाले आहे. महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यांचे परीक्षण करून महाविद्यालयास हा सन्मान देण्यात आला.
जिल्ह्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही जुनी आणि प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतानाच २०१२ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली गेली. या महाविद्यालयाचे नॅकद्वारे ८ व ९ जानेवारीला परीक्षण करण्यात आले. परीक्षणासाठी गठित केलेल्या परीक्षण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून झारखंड येथील कोल्हान विद्यापीठ, जमशेदपूरच्या कुलगुरू डॉ. शुक्ला महंती, समिती समन्वयक डॉ. प्रेमलथा पी. एन. (तामिळनाडू) तर सदस्य म्हणून केरळ येथील डॉ. फ्रान्सिस सनी होते. महाविद्यालयाच्या परीक्षण, पाहणी व पडताळणी यासंदर्भात ‘नॅक’द्वारे निकाल जाहीर झालेला असून, या महाविद्यालयाने २.३२ गुण मिळवून ‘बी’ श्रेणीत स्थान मिळविले आहे.
महाविद्यालयाच्या या यशामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रवीण लोकरे तसेच सर्व संचालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम सय्यद अंतर्गत (समन्वयक गुणवत्ता हमी कक्ष), सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मेहनत घेतली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.