सह्याद्री संस्थेतील गुणवतांचा सत्कार

सह्याद्री संस्थेतील गुणवतांचा सत्कार

Published on

-rat१८p६.jpg-
२५N३९४८०
सावर्डे ः गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना आमदार शेखर निकम व इतर.
---
सह्याद्री संस्थेतील
गुणवंतांचा गौरव
सावर्डे ः स्व. गोविंदराव निकम जयंती महोत्सव सोहळ्यानिमित्त सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शाळेमधील विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा व सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शिक्षणविस्तार आधिकारी राज अहमद देसाई, शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, ऑलिव्हर मर्चंड, चित्रकार प्रकाश राजेशिर्के उपस्थित होते. खेर्डी विद्यालयातील शिवाजी पाटील यांनी मध्यप्रदेश भोपाळ येथे संशोधन प्रकल्प सादर केल्याबद्दल तसेच शिंदे व श्रेया चाळके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
--
नर्मदा जयंतीदिनी
रत्नागिरीत कार्यक्रम
संगमेश्वर ः नर्मदा या पवित्र नदीची परिक्रमा केलेल्या बांधव-भगिनींसाठी नर्मदा जयंतीदिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या भक्तांनी नर्मदा मैयाची परिक्रमा पायी अथवा वाहनाने केली आहे अशा बांधव व भगिनींसाठी स्नेहसंमेलन व अनुभव कथन कार्यक्रम रत्नागिरी येथे होणार आहे. रथसप्तमीदिनी (४ फेब्रुवारी) नर्मदा जयंती साजरी केली जाते. याच औचित्य साधून हा कार्यक्रम होणार आहे. नर्मदा परिक्रमा पूर्ण व उत्तर नर्मदा परिक्रमा केलेल्यांनी उपेंद्र आगाशे व अमोघ पेंढारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com