सावंतवाडी शहरातील ख़ड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी

सावंतवाडी शहरातील ख़ड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी

Published on

swt1810.jpg
39515
सावंतवाडीः येथील रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

सावंतवाडी शहरातील खड्डे
तत्काळ बुजविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ः शहरातील मच्छीमार्केट येथील क्राऊन बेकरी कॉर्नर व इको बँक कॉर्नर या ठिकाणी रस्त्यावर पडलेले तीन खड्डे धोकादायक ठरणारे आहेत. दोन दिवसांपूर्वी या खड्ड्यांमध्ये पडून वृद्ध गंभीर जखमी झाला. स्लॅबवर पडलेल्या खड्ड्यांतून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त गॅसमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे पालिका प्रशासनाने त्वरित लक्ष वेधावे, असे मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
या खड्ड्यांबाबत वारंवार पालिकेला कळवूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ‘सामाजिक बांधिलकी’ची मदत घ्यावी लागत आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले. सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून कोणाच्याही जीवास धोका निर्माण होऊ नये, यासाठी या खड्ड्यांबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
.............
swt1811.jpg
N39516
सावंतवाडीः निशांत तोरसकर यांचा सत्कार करताना विनायर राऊत, अरुण दुधवडकर, सुधीर सावंत, वैभव नाईक व अन्य.

शहर संघटक तोरसकरांचा
ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर शिवसेना ठाकरे गटाच्या शहर संघटकपदी निशांत तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली. ओरोस शरद कृषी भवनमध्ये पार पडलेल्या ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, अरुण दुधवडकर, मेजर सुधीर सावंत, वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत, जान्हवी सावंत, संजय पडते, रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, डॉ. जयेंद्र परुळेकर आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त शहर संघटक तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com