खापणे महाविद्यालयात रंगली काव्यमैफल
खापणे महाविद्यालयात रंगली काव्यमैफल
राजापूर, ता. १८ : तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शेकोटीच्या साथीने थंडीवरील कवितांची काव्यमैफल रंगली. यामध्ये विद्यार्थ्यांनी थंडी, धुके यावर आधारित विविध कवितांचे सादरीकरण करत काव्यमैफल रंगवली.
महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्यावतीने ’मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त’ शेकोटी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी थंडीवरच्या विविधांगी कवितांचे सादरीकरण केले. दिवस छोटा रात्र मोठी चाले हा लपंडाव, दाट धुक्यात कुठे हरवले माझे गाव’ या सुजानी पांचाळ हिच्या कवितेतून धुक्यात हरवलेले गाव दिसत होते. या वेळी आरसीन गडकरी, सायरा काझी, प्राची पडवळ, ऋतुजा पांचाळ, सायली गुरव, सिद्धेश गोसावी, निसर्गा धावडे, दीक्षा गांगण, अमेय सावंत, प्राजक्ता बेर्डे, साहिल नर्वेकर, स्वाती सुर्वे, कलिका जाधव, सज्ञानी घागरे आदी विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन डॉ. विकास पाटील, तर आभार डॉ. बळवंत दाभाडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

