क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात चिपळूण पालिकेला जेतेपद

क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात चिपळूण पालिकेला जेतेपद

Published on

-ratchl१८२.jpg-
२५N३९५०६
चिपळूण ः सर्वसाधारण विजेतेपद पटकावल्यानंतर जल्लोष करताना मुख्याधिकारी व नगर पालिकेची टीम.
---
चिपळूण पालिकेला सर्वसाधारण जेतेपद
क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव; नगर विकास विभागातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः नगर विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात चिपळूण नगर पालिकेने सर्वसाधारण जेतेपद पटाकावले. चकमदार कामगिरी करताना अनेक बक्षिसांची लयलूट केली. त्यामुळे १९ व २० जानेवारीला पनवेल येथे होणाऱ्या विभागीय महोत्सवासाठी त्यांची निवड झाली आहे.
दापोली येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमधील बॅडमिंटनमध्ये प्रवीण नाईक यांनी विजेतेपद, टेबल टेनिसमध्ये अवधूत बेंद्रे यांनी उपविजेते, बुद्धिबळमध्ये निवेदिता आंबेकर, कॅरममध्ये प्रेरणा कांबळे यांनी उपविजेतेपद पटकावले. वैभव निवाते, महेश जाधव, अनिल सावंत, प्रवीण बुरटे, रोहन सकपाळ, अनिकेत सकपाळ, राजेंद्र नवरत, हर्ष कांबळी, शुभम जाधव, भूषण भोजने, ओंकार गोरिवले, संकेत राडे, अभय भुवड यांच्या कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले. रस्सीखेचमध्ये निवेदिता आंबेकर, मयुरी जाधव, राजक्रांती तांबे, संतोषी चोगले, कविता खंदारे, प्रेरणा कांबळे, लक्ष्मीबाई राऊत यांच्या संघाने चांगला खेळ करत उपविजेतेपद पटकावले. १०० मीटर धावणे पुरुष गटात अनिकेत सकपाळ याने द्वितीय, ओंकार गोरिवलेने तृतीय, महिला गटात निवेदिता आंबेकरने प्रथम, सायली खेतलेने द्वितीय, २०० मीटर धावणे पुरुष ओंकार गोरिवले द्वितीय, महिला गटात निवेदिता आंबेकर प्रथम, सायली खेतलेने द्वितीय क्रमांक पटकावला. लांबउडीत निवेदिता आंबेकर, गोळाफेकीत आनंद बामणेने द्वितीय, अनिकेत सकपाळने तृतीय क्रमांक मिळवला.
रत्नागिरी येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांमध्ये संतोषी चोगले, मयुरी जाधव, राजक्रांती तांबे, निवेदिता आंबेकर, मुक्ता कोकाटे, सायली खेतले, सतीश गोरिवले, संकेत रामाणे, राजेंद्र नवरत यांनी सादर केलेल्या नारीशक्ती पोवाड्याला द्वितीय कमांक प्राप्त झाला. निवेदिता आंबेकर, मयुरी जाधव, राजक्रांती तांबे, संतोषी चोगले, मुक्ता कोकाटे यांच्या घुमर रिमिक्सला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. श्रेष्ठा गावडे, श्रद्धा चव्हाण, वैष्णवी कांबळे, अवंतिका खातू, मंजिरी महाडीक, सायली खेतले, शर्वा कांबळी, मनिषा खरात यांनी जोगवा फ्युजन हे सामूहिक नृत्य सादर केले. त्याला तृतीय क्रमांक मिळाला. राकेश बारये याने सादर केलेल्या लावणी नृत्याने सर्वांना नावले. त्याने प्रथम तर कृष्णल मोहिते याने तृतीय क्रमांक पटकावला. एकंदरीत या दोन्ही महोत्सवात चिपळूण नगर पालिकेने मिळवलेल्या यशामुळे त्यांना सर्वसाधारण जेतेपद जाहीर करण्यात आले. त्यांना जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com