कुडाळात आज अंतिम सामन्याचा थरार
39565
कुडाळात आज अंतिम सामन्याचा थरार
राज्यस्तर क्रिकेट स्पर्धाः सावंतवाडीच्या स्पर्धेतील सर्वाधिक १०८ धावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः प्रिन्स पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरुर आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरीचा थरार उद्या (ता. १९) रंगणार आहे. धाडसकळ गोवा, फ्रेंडशिप चेंदवण, जय हनुमान परुळे, तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी संघ उपांत्य फेरीत दाखल झाले असून, उद्या सकाळी १० वाजता लॉटस टाकून सामने खेळविले जातील. तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी संघाने तुषार रणदिवेच्या २० चेंडूतील ५९ धावांच्या जोरावर तसेच मयूर कारंडेच्या १४ चेंडूत ३९ धावांच्या जोरावर मर्यादित सहा षटकांमध्ये स्पर्धेतील सर्वाधिक १०८ धावा जमविल्या.
प्रिन्स पोर्ट क्लब, समादेवी मित्र मंडळ कुडाळ व कलेश्वर मित्र मंडळ नेरुर आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेत चौथ्या दिवशी आजचा पहिला सामना गारवा सोहम स्पोर्ट कुडाळ व सिद्धिविनायक बाव या दोन संघांमध्ये झाला. यामध्ये सोहम गारवा स्पोर्ट संघ विजयी झाला. या संघातील विशाल हा सामनावीराचा मानकरी ठरला. दुसरा सामना लिंगेश्वर कोंडुरा व विजय स्पोर्ट माडखोल यांच्यामध्ये झाला. या सामन्यात लिंगेश्वर कोंडुरा संघ विजयी झाला. या संघातील अनिकेत हा सामनावीराचा मानकरी ठरला. तिसरा सामना ब्लू स्टार व ईसा इलेव्हन पिंगुळी यांच्यामध्ये झाला. यामध्ये इसा इलेव्हन विजयी झाला. या संघातील आबूतला सामनवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. पुढील सामना सातेरी कोचरा व तनुष स्पोर्ट सावंतवाडी यांच्यात होऊन तनुष स्पोर्ट भटवाडी संघ विजयी झाला. या संघातील मयूर कारंडे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. गारवा सोहम स्पोर्ट व लिंगेश्वर कोंडुरा यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात लिंगेश्वर कोंडुरा संघ विजयी झाला. या संघातील भाया पाटील सामनावीराचा मानकरी ठरला. पुढील सामना तनुष स्पोर्ट भटवाडी व इसा इलेव्हन पिंगुळी यांच्यामध्ये होऊन हा सामना तनुष स्पोर्ट संघाने सहज जिंकला. या सामन्यातील निहाल हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दिवसभरातील शेवटच्या सामन्यांमध्ये तनुष स्पोर्ट भटवाडी व लिंगेश्वर कोंडुरा यांच्यामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना तनुष स्पोर्टने तुषार रणदिवेच्या २० चेंडूतील ५० धावांच्या जोरावर तसेच मयूर कारंडेच्या १४ चेंडूत ३९ धावांच्या जोरावर मर्यादित सहा षटकांमध्ये स्पर्धेतील सर्वाधिक १०८ धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल लिंगेश्वर कोंडुरा संघ ६६ धावा करू शकला. तुषार रणदिवे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आजच्या सामन्यासाठी पंच म्हणून संदीप रुद्रे, सुशील शेडगे व उमेश मांजरेकर यांनी काम पाहिले. गुणलेखन सचिन कांबळी, रुपेश कुडाळकर यांनी, समालोचन काका नाईक, अशोक नाईक, रुपेश कुडाळकर, शेखर दळवी यांनी केले.
स्पर्धेचा उद्याचा अंतिम दिवस असून, धाडसकळ गोवा, जय हनुमान परुळे, फ्रेंडशिप चेंदवण, तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी यांच्यामध्ये विजेतेपदासाठी सामना होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

