रत्नागिरी ः वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक

रत्नागिरी ः वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक
Published on

वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बंधनकारक
आरटीओंना पत्र ; छेडछाड, बनावटगिरीला चाप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने सर्व वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. तसे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एचएसआरपी बसवण्याचे अनिवार्य केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाचे २२ डिसेंबर २०२४ ला तसे पत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहे.
केंद्रीय मोटारवाहन नियम, १९८९च्या नियम ५० नुसार वाहनांस एचएसआरपी बसवण्याची तरतूद केली आहे. रस्ते महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या ६ डिसेंबर २०१८च्या राजपत्रानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून वाहन चोरी करून त्यांच्या नंबरप्लेट बदलून पोलिस यंत्रणेला गुंगारा दिला जात होता. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत गेली. याला प्रतिबंध घालण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसवणे आवश्यक असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी M/S REAL MAZON INDIA LTD ही एजन्सी निश्चित केली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याकरिता बुकिंग पोर्टल https://hstpmhzone२.in हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टलला बुकिंग करून त्याच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेट घेऊन एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्याची कार्यवाही करावी.

चौकट
.....तरीदेखील आवश्यक
वाहनधारक रत्नागिरी कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त रत्नागिरीमध्ये वाहन वापर असेल तरीदेखील सदर वाहनास एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याकरिता पुढीलप्रमाणे शुल्क हे जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे.

चौकट...
वाहनाचे प्रकार शुल्क
दुचाकी, ट्रॅक्टर ४५०
तीनचाकी ५००
इतर सर्व वाहने ७४५

चौकट...
काय आहे हायसिक्युरिटी नंबरप्लेट
ही एक उच्च सुरक्षा नोंदणीप्लेट आहे. जी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सेट केलेल्या वैशिष्ट्यांचे पालन करते. एचएसआरपी प्लेटला एक अद्वितीय नोंदणी क्रमांक आहे आणि ती छेडछाड पुरावा, चोरी प्रतिरोधक आणि टिकाऊ म्हणून डिझाइन केलेली आहे. ती छेडछाडविरोधी, चोरी प्रतिरोधक आणि टिकाऊ म्हणून डिझाइन केलेली आहे. यात हॉट स्टॅम्प केलेला अल्फान्युमरिक कोड असतो आणि त्यात कलरकोडेड पट्टी असते. या प्लेटमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, एक होलोग्राम स्टिकर आणि एक अद्वितीय ओळख क्रमांक समाविष्ट असतो. नोंदणी क्रमांक हा सामान्यतः सरकारद्वारे वाहनाला नियुक्त केलेल्या अक्षरे आणि क्रमांकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com