उबाठातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक
ठाकरे गटातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक
२४ ला मोठा पक्षप्रवेश होण्याचे संकेत ; खदखद बाहेर पडणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी प्रचंड अस्वस्थ आहेत. निष्ठावंतांना मिळालेल्या वागणुकीनंतर ठाकरे गटामध्ये खदखद आहे. त्याचा फायदा घेत उद्योगमंत्री आणि शिवेसना नेते उदय सामंत यांनी शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची कालच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये गुप्त बैठका झाल्या. २४ तारखेला दावोसवरून आल्यानंतर मोठा पक्षप्रवेश होईल, असे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.
शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्ट केले. सामंत पुढे म्हणाले, आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना कळून चुकलेय की, आम्ही सच्चे होतो आणि आहोत. ठाकरेगट काँग्रेसबरोबर गेल्यामुळे त्या पक्षातील सर्वजण आता शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय भविष्य सांगायचे झाल्यास ठाकरे गटाची जिल्ह्यात काँग्रेस संघटना झाल्याचे चित्र पाहायला मिळणार असल्याचा चिमटा सामंत यांनी काढला. रत्नागिरीत मोठा राजकीय पक्षप्रवेश होणार, याचे संकेत त्यांनी दिले. रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत हे नियोजित कार्यक्रम सोडून सुमारे तासभर अज्ञातस्थळी मोजक्या पदाधिकाऱ्यांना घेऊन गेले होते. त्यानंतर काही काळातच समजले की, उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांची गुप्त बैठक होती. त्यामुळे प्रवेशाची पूर्ण तयारी सामंत यांनी केली आहे असे समजते. परंतु राज्याचे एक शिष्टमंडळ जागतिक परिषदेला दावोसला जाणार आहे. यामध्ये उद्योगमंत्री सामंतदेखील आहेत.
---
ठाकरे गटाला देणार धक्का
दावोसच्या दौऱ्यावरून आल्यानंतर रत्नागिरी दौऱ्यार येऊन मोठा पक्षप्रवेश करत ठाकरे गटाला धक्का देणार असल्याचे संकेत सामंत यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये दबदबा असलेला ठाकरे गटाचा बडा नेता तसेच पक्षाचे काही प्रमुख, वरिष्ठ पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते २४ ला सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

