मराठा समाजाने राज्यकर्ते व्हावे, उद्योजक बनावे
-rat१८p२१.jpg-
२५N३९५८७
रत्नागिरी : अखिल मराठा महासंमेलनात इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना पुरस्कार देताना खासदार नारायण राणे, सुरेश सुर्वे , दुसऱ्या छायाचित्रात पुरस्कारप्राप्त डॉ. सुरेश हावरे, तिसऱ्या छायाचित्रात उमेश भुजबळराव आणि चौथ्या छायाचित्रात संस्थापक अप्पासाहेब पवार यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना योगेश पवार, सुवर्णा पवार आणि विरेंद्र पवार.
----------
लोगो.... अखिल मराठा महासंमेलन
मराठा समाजाने राज्यकर्ते व्हावे, उद्योजक बनावे
अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे ; समाजभूषण पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : मराठा समाजाने इतरांना देणारे व्हावे, आपल्या वैभवशाली इतिहासाप्रमाणे राज्यकर्ते राहावे. आता नोकऱ्या मिळत नाहीत त्या संपत आल्या आहेत. शेतीची अवस्था आपण पाहतोय. मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे उद्योगाकडे वळावे. शेतीपूरक उद्योगही करता येतील. त्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन अणुशास्त्रज्ञ आणि बांधकाम व्यावसायिक डॉ. सुरेश हावरे यांनी व्यक्त केले. येथील हॉटेल विवेक येथे अखिल मराठा फेडरेशनच्या महासंमेलनात ते बोलत होते. त्यांना अखिल मराठा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संमेलनात खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार, अॅडव्हान्स इंजिनिअरिंग तज्ज्ञ उमेश भुजबळराव यांना अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल मराठा फेडरेशनचे सुरेश सुर्वे म्हणाले की, आज महासंमेलनाला देशातील सर्व मराठा मंडळांचे प्रतिनिधी आले आहेत. मंडळाच्या कार्यात तरुण, तरुणींनी यायला हवे. स्पर्धा परीक्षा, संरक्षण खात्यातही परीक्षा देऊन पुढे गेले पाहिजे. याकरिता मुंबईत मराठा भवन उभारणी करण्यात येणार आहे. आपण नोकरी देणारे झालो पाहिजे. आपण सर्वांनी कोणाच्या विरोधात नव्हे तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येऊया.
विरेंद्र पवार यांनी सांगितले की, अप्पासाहेब पवार १९७१ मध्ये जि. प. सदस्य म्हणून विजयी झाले. त्यानंतर मराठा समाजासाठी त्यांनी अखेरपर्यंत योगदान दिले. रत्नागिरीत झालेल्या प्रचंड गर्दीने हे महासंमेलनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, याबद्दल पवार कुटुंबीयांना अभिमान वाटतोय.
मंचावर सेवानिवृत्त मुख्य आयकर अधिकारी अरूण पवार, दिलीप जगताप, सुनीलदत्त देसाई, संतोष घाग, वीरेंद्र पवार, सुरेश कदम, राजेंद्र सावंत, राजेंद्र साळवी, दीपक परब, दिलीप चव्हाण, सुहास फळदेसाई, सुनील राजेशिर्के, राकेश नलावडे, अमिष बने, जितेंद्र पवार, सुभाष राणे, विजय कदम, सहदेव सावंत आदी उपस्थित होते.
---
महिलांनाही प्राधान्य हवे
इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, आज देशातील मराठा समाज एकत्र आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे; परंतु शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो तेव्हा मराठा महिलांनाही सन्मान, पुरस्कार दिला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

