-प्रचितगडावरील ऐतिहासिक ठेवा जतनाचा संकल्प

-प्रचितगडावरील ऐतिहासिक ठेवा जतनाचा संकल्प

Published on

-rat१८p११.jpg-
OP25N39581
संगमेश्वर ः प्रचितगड
-rat१८p१२.jpg-
25N39582
संगमेश्वर ः प्रचितगडाचे प्रवेशद्वार
----
प्रचितगडावरील ऐतिहासिक ठेवा जतनाचा संकल्प

संगमरत्न फाउंडेशन : २५, २६ ला स्वच्छता मोहीम, ५० गिर्यारोहकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः तालुक्यातील तिवरेघेरा प्रचितगड येथील प्रचितगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत या किल्ल्याची दूरवस्था झाली आहे. प्रचितगड किल्ला विशेष संवर्धन मोहीम संगमरत्न फाउंडेशनकडून (एनजीओ) राबवली जात आहे. २५ व २६ ला किल्ल्यावर स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे प्रचितगड किल्ला एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल, असे संगमरत्न फाउंडेशनचे अल्पेश सोलकर याने सांगितले.
तिवरेघेरा प्रचितगड येथील किल्ले प्रचितगड हा छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनपटाचा साक्षीदार आहे. या ऐतिहासिक गडाचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी प्रथम संगमरत्न फाउंडेशनने पावले उचलली आहेत. अल्पेश यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील अनेक गिर्यारोहकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यात तेजस्वी जावकर (बोरिवली), साक्षी जोशी (ठाणे), नीतेश तरळ (नवी मुंबई), रोहन चव्हाण (रोहा), सूरज गोरिवले (महाड), पूजा आंब्रे (संगमेश्वर) यांच्यासह पन्नास गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही मोहीम इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, गडकिल्ले याबाबत ज्ञान असलेले डॉ. सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येणार आहे.
हा किल्ला शृंगारपूर आणि तिवरेघेरा या गावाजवळून ५४० मीटर उंचीवर आहे. किल्ल्याकडे येणाऱ्या दोन्ही वाटा सह्याद्रीची मुख्य रांग आणि किल्ला यामधील खिंडीत एकत्र येतात. खिंडीतून पुढे एका शिडीवरून किल्ल्यावर पोहोचता येते. ती शिडीही खराब झालेली आहे. त्यापुढे कातळात खोदलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजाची कमान अस्तित्वात नसली तरीही कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत. दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजावर शिल्पकाम होते की नाही, हे समजून येत नाही. दरवाजाच्या आतील बाजूस सैनिकांसाठी देवड्या नाहीत. किल्ल्यात थोड्याच अंतरावर मंदिर व बांधीव तलाव, टाके आहेत.
किल्ल्याजवळील प्रमुख प्रवेशद्वारांची आणि आंतरिक संरचनांची साफसफाई केली जाणार आहे. ऐतिहासिक नोंदींचा वापर करून किल्ल्याचे ऐतिहासिक रूप पुन्हा राखले जाईल. पर्यटनासाठी किल्ल्यावरील पायवाटा, सूचनाफलक आणि मार्गदर्शन सेवा प्रदान केली जाणार आहे. स्थानिक लोकांना शैक्षणिक कार्यक्रम आणि कार्यशाळांद्वारे किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
---
खडकात खोदलेली पाच टाकी
प्रचितगड किल्ला हा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण टोकाकडे भवानीदेवीचे घुमटीसदृश मंदिर आहे. मंदिरात मुख्य दोन मूर्ती दिसतात. एक मूर्ती अंदाजे ३ फूट उंच असून, ती भैरवाची असावी तर दुसरी मूर्ती २.५ फूट उंच असून, ती देवीची आहे. किल्ल्यावर चार तोफा आहेत. कातळात लेण्यासारखी खोदलेली पाण्याची टाकी असून त्याला खांब आहेत. खडकात खोदलेली एकूण पाच टाकी या भागात दिसतात. ही टाकी आतून एकमेकांना जोडलेली आहेत. टाकी पूर्वेकडे तोंड करून गडाच्या माथ्याच्या पोटात आहेत. गडावरील जोत्यावर चार तोफा ठेवलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com