बांदा वाचनालयाने केलेला सन्मान विशेष
45409
बांदा वाचनालयाच्या सन्मानाने भारावले
पूर्णिमा गावडे-मोरजकर ः नेरुरकर साहित्य पुरस्काराने गौरव
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः हा माझ्या जीवनातील पहिलाच पुरस्कार आहे. ज्याठिकाणी माझे बालपण व शालेय शिक्षण झाले त्याठिकाणी माझा झालेला सन्मान हा न विसरता येण्यासारखा आहे, असे प्रतिपादन रोणापाल येथील मालवणी साहित्यिका पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनी येथे केले. येथील नट वाचनालय संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरुरकर साहित्य पुरस्कार नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती पूर्णिमा गावडे-मोरजकर, सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सदस्य प्रकाश पाणदरे, स्वनिता सावंत, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश माजगावकर, शंकर नार्वेकर, जयंत पिंगुळकर, शुभांगी पिंगुळकर, संतोष वालावलकर आदी उपस्थित होते. श्री. केसरकर यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून आदरांजली वाहण्यात आली. (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नेरुरकर यांच्याविषयी प्रकाश पाणदरे, शंकर नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष वालावलकर यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या. सहसचिव हेमंत मोर्ये यांनी पूर्णिमा गावडे यांना द्यावयाच्या मानपत्राचे वाचन केले. साहित्यिका गावडे यांचा वाचनालयाचे अध्यक्ष सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सौ. गावडे-मोरजकर यांनी नट वाचनालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आपल्या मालवणी साहित्यकृती ‘गजाल गाथण’ व एकूण मालवणी साहित्याविषयी माहिती दिली. रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावडे यांनी आपला ‘गजाल गाथण’ हा कथासंग्रह वाचनालयाला भेट दिला. वाचनालयाचे संचालक जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, रोणापालचे माजी सरपंच प्रकाश गावडे, उदय देऊलकर, प्रवीण परब, कास सरपंच प्रवीण पंडित, राकेश परब, अजित दळवी, उदय गावडे, प्रफुल्ला गावडे, प्रिया केतकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

