कोकण विभागात युनायटेड गुरुकुलला प्रथम क्रमांक

कोकण विभागात युनायटेड गुरुकुलला प्रथम क्रमांक

Published on

rat16p17.jpg-
45558
चिपळूण येथील युनायटेड स्कूलच्या गुरुकुल विभागातर्फे पारितोषिक स्विकारताना प्रशालेचे अध्यापक.

युनायटेड गुरुकुलला प्रथम क्रमांक
आंतरशालेय समूहगान स्पर्धा ; उत्कृष्ट पोवाड्याचे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ः मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी ज्ञानप्रबोधिनीतर्फे २९ व्या वर्षी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धांमध्ये पोवाडा सादरीकरणात युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या गुरुकुल विभागाने कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थी समूहगान, पोवाडा, अध्यापक समूहगान सूर्यनमस्कार आणि श्रमदान या सर्व स्पर्धांमध्ये मुलांनी अतिशय उत्साहाने सादरीकरणे केली. या स्पर्धेतील विद्यार्थी समूहगान या प्रकारात गुरुकुलच्या मुलांनी ‘भारतवासी आम्ही सारे दिग्विजयी होऊ’ हे नवीन गीत सादर केले. या यानिमित्ताने गुरुकुलातील अध्यापक पराग लघाटे यांनी शब्दबद्ध व संगीतबद्ध केलेला अहिल्याबाईंचा पोवाडा गुरुकुलाच्या संगीत विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केला. या पोवाड्याच्या सादरीकरणाला कोकण विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुकुलातीलच विद्यार्थी व अध्यापकांनी तयार केलेले नवीन गीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित सादर केले. या सादरीकरणाला कोकण विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्याचबरोबर चालू वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तीनशे वे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते समूहगीत व पोवाडा सादरीकरण करण्याची प्रक्रिया मुलांना निश्चित आनंद देणारी ठरली. या स्पर्धेसाठी गुरुकुल विभाग प्रमुख मंगेश मोने सर आणि गुरुकुलातील सर्व अध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मनोहर सभागृह नवानगर विद्यालय निगडी येथे झाले. या संस्थेच्याच पोफळी प्रशालेच्या अध्यापक सहकाऱ्यांनी गुरुकुल विभागामार्फत प्रतिनिधी म्हणून पारितोषिक स्वीकारले. गुरुकुल विभागाच्या या स्पर्धेतील यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच पदाधिकारी आणि युनायटेड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली पाटील, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक संदीप मुंढेकर यांनी गुरुकुलच्या मुलांचे कौतुक केले.

चौकट
उत्कृष्ट सादरीकरण
गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील सहभाग एक अभ्यास प्रक्रिया म्हणून अनुभवला. या स्पर्धेच्या अनुषंगाने भारताचा सांस्कृतिक, प्राकृतिक अभ्यास करत करत गीत रचना, शब्दबद्धता आणि चाल अशा दृष्टिकोनातून नवीन गाणे तयार करण्याचा अनुभव घेत त्याला सरावाची जोड दिली. त्यामुळे सादरीकरण उत्कृष्ट झाल्याचे प्रशालेतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com