आरोग्य विभागाने पटकाविले सर्वसाधारण विजेतेपद

आरोग्य विभागाने पटकाविले सर्वसाधारण विजेतेपद

Published on

rat१६p११.jpg
45535
रत्नागिरीः सर्वसाधारण विजेतेपदाचा फिरता चषक स्विकारताना आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

आरोग्य विभागाने पटकाविले
सर्वसाधारण विजेतेपद
वार्षिक क्रीडा स्पर्धा; फिरता चषक देऊन गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः जिल्हा परिषद जनरल चॅम्पीयनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) आरोग्य विभागाने पटकाविले. त्यांना फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे २९ वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. या अंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा प्रकारात कामगिरी केली आहे. त्यामध्ये क्रिकेट पुरुष गटाचे विजेते पद, क्रिकेट पुरुष (४५+) उपविजेतेपद, व्हॉलीबॉलविजेते पद, क्रिकेट महिला उपविजेता पद, बॅडमिंटन महिला विजेते पद, कॅरम एकेरी महिला विजेते पद, कॅरम दुहेरी महिला विजेते व उपविजेतेपद, कॅरम मिश्र उपविजेतेपद, २०० मीटर धावणे विजेतेपद, ४०० मीटर धावणे उपविजेतेपद, लांबउडी विजेतेपद, कॅरम दुहेरी उपविजेतेपद पटकाविले. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्हा परिषद जनरल चॅम्पीयनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) फिरता चषक पटकावला.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार आणि सर्व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com