सर्वसाधारण विजेतेपदाचा मान विज्ञान विभागाला
सर्वसाधारण विजेतेपदाचा
मान विज्ञान विभागाला
आठल्ये-सप्रे महाविद्यालय क्रीडा स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. १६ : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद विज्ञान विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकाविले.
वार्षिक परितोषिक वितरण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, संस्था कार्यवाह शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. डॉ. अमित वराळे आणि विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी सुयोग रहाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. याप्रसंगी वार्षिक अहवालाचे वाचन विद्यार्थीनी पायल दोरखडे हिने केले. याप्रसंगी क्रीडा कला व सांस्कृतिक स्पर्धा-उपक्रमातील नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी ''स्व. राजा राजवाडे उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्काराचे'' वितरण करण्यात आले. या वार्षिक अंक स्पर्धेचे परीक्षण निवृत्त शिक्षिका सौदामिनी कुलकर्णी व मंगला अळवणी यांनी केले होते. या स्पर्धेत गोगटे–जोगळेकर महाविद्यालय (प्रथम), डी. बी. जे. महाविद्यालय (द्वितीय) आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या तृतीय वर्ष, विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचा गौरव केला गेला.
यावेळी डॉ. सुरेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा जीवन प्रवास आपल्या मार्गदर्शनातून सांगितला. त्यांच्या देवरुखमधील ५० वर्षांपेक्षा अधिक वास्तव्यातील आठवणींना उजाळा दिला. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम विशद केले. त्यांनी तरुणांना स्वतःचा विकास करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

