कुंभार समाजबांधवांचा सार्थ अभिमान

कुंभार समाजबांधवांचा सार्थ अभिमान

Published on

45586

कुंभार समाजबांधवांचा सार्थ अभिमान

प्रकाश साळवी ः कोलगावात मंदिर कलशारोहण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः कोलगाव कुंभारवाडी (ता.सावंतवाडी) येथील संत शिरोमणी गोरा कुंभार सेवा मंडळ ही संस्था आदर्शवत कार्य करीत असून समाजाला अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे. महाराष्ट्रात आपल्या कार्यातून श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळाच्या बांधवांनी विधायक संदेश दिला आहे. त्याचा समाज बांधव म्हणून मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार कोकण विभाग कुंभार सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशाचे कोकण अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी कोलगाव येथे काढले.
श्री संत शिरोमणी गोरा कुंभार यांच्या जयंतीनिमित्त संत गोरोबा काकांचे कोलगाव कुंभारवाडी येथील मंदिराच्या नूतन सभागृहाचे उद्‍घाटन व कलशारोहण समारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कुंभार सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विलास गुडेकर, संपर्क प्रमुख प्रा. गणपत शिरोडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, कुंभार संघटना जिल्हाध्यक्ष नारायण साळवी, उपाध्यक्ष यशवंत शेदुलकर, दिलीप हिंदळेकर, विष्णू माणगावकर, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर तसेच चिपळूण येथील पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम साळवी, संचालक प्रमोद निवडकर, संचालक तुकाराम साळवी, युवा कार्यकर्ते महेश साळवी, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य पूनम उगवेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार, चंदन धुरी, काशिनाथ तेंडुलकर, श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळ, कोलगाव कुंभारवाडीचे अध्यक्ष गणेश उर्फ बाळा हरमलकर, संदीप गवस, प्रकाश सावंत, आदी उपस्थित होते. दरम्यान, मायकल डिसोजा यांनी, कुंभार समाज बांधवांनी नेहमीच संयम दाखवून तसेच एकोप्याने कार्य करून आपल्या वागण्याने आदर्श नागरिक कसा असावा, याचे दर्शन घडविले आहे, असे सांगितले. विलास गुडेकर यांनी समाज बांधवांना सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देत आर्थिक देणगीही जाहीर केली.
कार्यक्रमाचे संयोजन गणेश हरमलकर, ललित हरमलकर, राजा कुडाळकर, चंद्रकांत कुडाळकर, गौरव कुडाळकर, कृष्णा हरमलकर, बुधाजी हरमलकर, सचिन पिकुळकर, दीपक कुंभार, सूरज कुडाळकर आदींनी केले. या सोहळ्यानिमित्त यात सकाळी प्रकार शुद्धी व नवग्रह होम, कलशारोहण समारंभ, दुपारी आरती व तीर्थप्रसाद, रात्री वृंदावन संगीत साधना ग्रुप, पिंगुळी (कुडाळ) यांचा अभंग, भक्तिगीते व नाट्यगीते गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. मंडळाचे अध्यक्ष हरमलकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रुपेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ललित हरमलकर यांनी आभार मानले.
---
‘हरमलकरांमुळे मंदिराची इच्छा पूर्ण’
प्रा. शिरोडकर यांनी, कोलगाव कुंभारवाडी येथे संत शिरोमणी गोरा काकांचे मंदिर व्हावे, अशी अनेक दिवसांपासून इच्छा होती. ती इच्छा बाळा हरमलकर यांच्या पुढाकाराने व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाने आज पूर्ण झाली आहे, याचा आनंद व अभिमान असून कोलगाव कुंभारवाडीतील समाज बांधवांनी जो एकोपा दाखवलाय, तो निश्चित कौतुकास्पद आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com