मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांना फलदायी
45587
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग फलदायी
संदेश किंजवडेकर ः कुडाळात ‘अखिल महिला सेल’चा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः अखिल महिला सेल कुडाळचा मार्गदर्शन वर्ग विद्यार्थ्यांना फलदायी ठरेल. हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले.
अखिल महिला सेल कुडाळ यांच्यावतीने चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी होण्याच्या दृष्टिकोनातून एकदिवसीय मार्गदर्शन वर्गाचे आयोजन कुडाळ शाळा क्रमांक एक येथे करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन कुडाळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी किंजवडेकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर कुडाळ केंद्राचे केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, अखिल सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, राष्ट्रीय सचिव तसेच राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, के. टी. चव्हाण, स्वप्नाली सावंत, केंद्र मुख्याध्यापक आनंद पवार, तालुकाध्यक्ष यल्लाप्पा दळवी, अरुण म्हाडगुत, भीवा सावंत, प्रकाश तेंडोलकर, अर्चना देसाई, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोसावी आदी उपस्थित होते.
या मार्गदर्शन वर्गास विलास गोठोसकर, तेजस बांदिवडेकर, हरिश्चंद्र कालेलकर, एकनाथ कुर्लेकर, चैताली जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वर्गाचा कुडाळ तालुक्यातील चौथीतीतल जवळपास २४० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सेल अध्यक्ष स्नेहा सावंत, सचिव ऋतुजा गावडे, प्रणाली कवीटकर, कृषाली चव्हाण, अरुणा घाटकर, प्रेरणा वारंग, साक्षी तुळसुलकर, मोहिनी वस्त, चंद्रलेखा तांबे, सदिच्छा कसालकर यांनी विशेष मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

