भगवंतगडावर बुधवारी शिवजयंती सोहळा
भगवंतगडावर बुधवारी
शिवजयंती सोहळा
आचरा ः चिंदर गावचा मानबिंदू असलेल्या किल्ले भगवंतगड येथे चिंदर सेवा संघाच्यावतीने चिंदरवासीयांच्या सहकार्यांने बुधवारी (ता. १९) शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दीपक सुर्वे, चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, त्रिंबक हायस्कूल माजी मुख्याध्यापक हेमांगी खोत, चिंदर केंद्राचे माजी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, केंद्रप्रमुख राजेंद्र गाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वर्ग, शिवप्रेमी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. यावेळी चिंदर गावातील विद्यार्थ्यांची शिवकालीन ऐतिहासिक प्रसंगावर कथाकथन स्पर्धा होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन चिंदरवासीयांनी केले आहे.
................
सावंतवाडीत बुधवारी
‘शिवस्वराज्य यात्रा’
सावंतवाडी ः येथील स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रॅली स्वराज्य संघटनेतर्फे रॅली आयोजित करण्यात येते. यंदा बुधवारी (ता. १९) सकाळी १० पासून या दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. येथील ऐतिहासिक राजवाडा येथून रॅलीला प्रारंभ होणार आहे. ही रॅली शहरातून मार्गस्थ होणार आहे. या रॅलीत विविध ऐतिहासिक देखावे, चित्ररथांसह खास आकर्षण असणार आहे. भगवे झेंडे, भगवे फेटे खास आकर्षण असणार आहे. या रॅलीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वराज्य संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

