छत्रपती शिवरायांचे बल्बमध्ये चित्र

छत्रपती शिवरायांचे बल्बमध्ये चित्र
Published on

45660

छत्रपती शिवरायांचे बल्बमध्ये चित्र

समीर चांदरकरांची कल्पकता; नाविन्यपूर्ण कलाकृतीचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : शिवजयंतीचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी विजेच्या बल्बमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. साडेतीनशे वर्षे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या रयतेला गुलामगिरीच्या चोखडातून मुक्त करत स्वातंत्र्याची पहाट दाखविणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आजही सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत. विजेचा बल्ब जसा प्रकाश देतो, तसेच शिवरायांचे कार्य, विचार आजही आपल्याला प्रकाशमान करतात. याच धर्तीवर कलाशिक्षक चांदरकर यांनी बल्बमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. यासाठी त्यांनी बल्बच्या वरून छेद केला. सरळ ब्रशने रंगकाम करणे शक्य नसल्यामुळे ब्रशला काटकोनात वळवून अॅक्रेलिक रंगांच्या सहाय्याने ही प्रतिमा साकारली. यासाठी तब्बल तीन तासांचा कालावधी लागला. अशी नाविन्यपूर्ण साकारलेली महाराजांची महाराष्ट्रातील पहिलीच कलाकृती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com