किर्लोसमध्ये ग्रामस्थांकडून
खवले मांजराला जीवदान

किर्लोसमध्ये ग्रामस्थांकडून खवले मांजराला जीवदान

Published on

45613

किर्लोसमध्ये ग्रामस्थांकडून
खवले मांजराला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : किर्लोस आमवणे येथे खवले मांजराला जीवदान देण्यात आले. सुनील घाडीगावकर यांनी वन्यप्राणी खवले मांजर जाळीत अडकल्याची माहिती देताच तातडीने वनखात्यातर्फे ही मोहीम राबविण्यात आली.
कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ मालवणचे वनपाल सदानंद परब, वनरक्षक शरद कांबळे, लक्ष्मण आंबले, वनसेवक अनिल परब आदी अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून खवले मांजरची ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका करत नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी वीर घाडीगावकर, सागर घाडीगावकर, विनोद भावे, विशाल भावे, सुशील घाडीगावकर, हर्षद घाडीगावकर आदी उपस्थित होते. खवले मांजर पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून त्याच्या संरक्षणाबाबत सर्वांनी जागरुकता बाळगावी, असे वनविभागाने आवाहन केले आहे. या रेस्क्यूमध्ये सहभागी सुनील घाडीगावकर व त्यांचे सहकारी तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे तालुक्यासह परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com