बांधकाम कामगारांनो, योजनांचा लाभ घ्या
45623
45624
बांधकाम कामगारांनो, योजनांचा लाभ घ्या
पंढरी चव्हाण ः पणदूर येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ःबांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करून लाभ घ्यावा, असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. यावेळी बांधकाम कामगारांच्या सुमारे ८००हून अधिक मुलांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्रच्यावतीने बांधकाम कामगारांच्या मुलांचा सन्मान सोहळा व कामगार मार्गदर्शन स्नेहमेळाव्याचे आयोजन पणदूर हायस्कूल गंगाबाई दळवी सभागृह या ठिकाणी केले होते. याचे उद्घाटन श्री. चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, भारतीय चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष सी. आर. चव्हाण, अरुण होडावडेकर, श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण, उद्योजक बाबल पावसकर, श्रमिक कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामदास तेंडोलकर, सौ. सरिता राऊत, पूजा बागकर, अनघा रांगणेकर, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘श्रमिक कामगार कल्याणकारी संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांसाठी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत शालेय पातळीवर एक ते तीन क्रमांकाच्या गुणावंतांचा गौरव झाला. मात्र, बांधकाम कामगारांच्या आठशेहून अधिक संख्येने असणाऱ्या गुणवंत मुलांचा गौरव होणारा हा पहिलाच कार्यक्रम असेल. यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाची सर्व टीम या कौतुकास पात्र आहे. बांधकाम कामगारांनी एकत्र येऊन अन्यायाच्या विरोधातही आवाज उठवावा.’’
सौ. कुडाळकर यांनी श्रमिक कामगार कल्याणकारी संघाने यानिमित्ताने विद्यार्थी व पालक यांना एकत्र आणून जो सन्मान सोहळा केला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांचा गौरव हा सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. शासनाच्या विविध योजना आहेत. सरकार जसे बदलते तशा योजना बदलतात. आता ज्या योजना कार्यरत आहेत, त्याचा प्रत्येकाने लाभ घेऊन वाटचाल केली पाहिजे. बांधकाम कामगारांच्या मुलांनी भविष्याचे वेध घेताना मोठमोठ्या पदावर वाटचाल करताना जिल्हाधिकारी, विविध पदांचे अधिकारी यासाठी सुद्धा पावले टाकली तर ती सिंधुदुर्गासाठी निश्चितच भूषणावह ठरेल, असे सांगितले. श्री. तेंडोलकर यांनी शासनाच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी इमारत बांधकाम क्षेत्रातील कामगार आता जागा झाला पाहिजे. ज्या अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी श्रमिक कामगार कल्याणकारी संघ निश्चितच काम करणार आहे. यासाठी तुम्ही एकत्र या, असे आवाहन केले. श्री. कुबल यांनी जिल्ह्यात पंचवीस हजार बांधकाम कामगार कार्यरत असून त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, याबाबत मार्गदर्शन केले. नीलेश गोसावी आणि भारत पेंडूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
----------------
गावागावात आरोग्य शिबिर घेणार ः चव्हाण
अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी बांधकाम कामगारांच्या २१ योजना सह बांधकाम कामगारांचे आरोग्य सुद्धा महत्त्वाचे आहे. या संघाच्या माध्यमातून लवकरच गावागावात आरोग्य तपासणी शिबिर घेऊन शासनाच्या आरोग्य विषयीच्या योजना आहेत, त्याचा लाभ आपल्या बांधकाम कामगारांना कसा मिळेल० या दृष्टीने मी सर्वांच्या सहकार्याने मी कार्यरत राहणार असण्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

