ग्रामोद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी तांडेल
ग्रामोद्योग संस्थेच्या
अध्यक्षपदी तांडेल
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल तर उपाध्यक्षपदी तृप्ती साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर अधिकारी प्रशांत साळगावकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. यावेळी वेंगुर्ले तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे सदस्य विलास दळवी, सुमन कामत, वंदना कांबळी, मोहन नंदगडकर, सायली पोखरणकर, नाना कोळेकर, प्रसाद पेडणेकर, विष्णू दाभोलकर, सचिव दिव्या पार्सेकर आदी उपस्थित होते. यावेळी अधिकारी प्रशांत साळगावकर व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कणकवलीत शिबिरात
३२ जणांची चिकित्सा
कणकवली : रोटरी क्लब कणकवली सेंट्रलने सुरू केलेल्या फिजिओथेरपी सेंटरच्या प्रारंभानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये ३२ जणांनी लाभ घेतला. कणकवली रेल्वेस्थानकाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वारासमोरील बेलवलकर कॉम्प्लेक्स येथील रोटरीच्या कार्यालयातील जानकी बेलवलकर सभागृहात फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त हे मोफत शिबिर घेण्यात आले. याचे उद्घाटन पत्रकार अजित सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरीचे जिल्हा समन्वयक राजेश घाटवळ, अजय ऊर्फ बंडू गांगण, रोटरी कणकवलीचे अध्यक्ष प्रा. जगदीश राणे, चार्टर अध्यक्ष दीपक बेलवलकर, अॅड. दीपक अंधारी, सीताराम ऊर्फ दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, राजश्री रावराणे, लीना काळसेकर, दिशा अंधारी, डॉ. धनंजय रासम, डॉ. अमेय मराठे, अनिल कर्पे, धनंजय कसवणकर, लवू पिळणकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. शुक्ला व सहायक उपस्थित होते. सूत्रसंचालन दादा कुडतरकर यांनी केले.
विविध विकासकामांचे
दारिस्तेत भूमिपूजन
कणकवली, ता. १६ ः राज्याच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या दारिस्ते गावातील पावणेदोन कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. मंजूर कामांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून दारिस्तेतील १४ विहिरींना मंजुरी मिळाली आहे. या विहिरींसह वरचीवाडी रस्ता डांबरीकरण, सुतारवाडी वरचीवाडी स्मशानभूमीपर्यंत रस्ता, गावकरवाडी रस्ता, नमसवाडी पायवाट बांधणे, हुलेवाडीसाठी पथदीप ही सर्व विकासकामे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सहकार्याने व संदेश सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहेत. दारिस्ते सरपंच सानिका गावकर, उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य भाई सावंत, वैष्णवी सुतार, नेहा सावंत, वृषाली कदम, सुरेश गावकर, बाबी साळसकर, महेश सुतार, गणेश कदम, विनायक गुरव, गोपी सुतार, दाजी शेलार, संजय गावकर, अण्णा कुबल, गणेश गुरव, विठ्ठल रासम, लक्ष्मण ठाकूर, संतोष देसाई, प्रकाश तांबे, मधू जाधव, भाऊ सावंत, कुशाजी गावकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

