राजापूर-जवळेथरमार्गे तिथवली रस्त्यावरील दुतर्फा झाडी धोकादायक
rat१६p३९.jpg-
४५६४६
राजापूरः पाचल ते तिथवली मार्ग अरुंद व दुतर्फा झाडीमुळे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
---------------
जवळेथरमार्गे तिथवली रस्त्यावरील झाडी धोकादायक
घाटमाथ्यावर जाण्यासाठी सोयीचा; रस्ता रुंदीकरणाचीही गरज
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ः राजापूर तालुक्यातील पाचल जवळेथरमार्गे तिथवली हा रस्ता दिले अनेक वर्ष अरुंद आहे. या मार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे व रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्यामुळे हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे.
तत्कालीन खासदार स्व. मधु दंडवते यांच्या कालखंडामध्ये पाचल ते जवळेथर या रस्त्याचे काम १९७७ ते ७८ यादरम्यान करण्यात आले आणि हा रस्ता वाहतुकीस खुला झाला. तेव्हापासून आत्तापर्यंत या रस्त्याची स्थिती आहे तशीच आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये या रस्त्याचे वारंवार नुतनीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. सध्या कारूळ भुईबावडा हे घाट वाहतुकीला बंद असल्यामुळे कोल्हापूर, सातारा या ठिकाणी जाणारे अनेक पर्यटक व वाहनचालक तिथवलीमार्गे पाचलवरून अणुस्कुरा घाटमार्गे घाट माथ्यावर भार पडतात. हा मार्ग वाहन चालकांना जवळचा असल्याने दिवसेंदिवस या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावरून चालताना वाहन चालकांबरोबर पादचाऱ्यांना फिरणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
कोट
या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे समोर येणारे वाहन सहजगत्या दिसत नाही. या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे अरुंद रस्त्यामुळे व वाढलेल्या झाडीमुळे हा मार्ग धोकादायक आहे. या संदर्भात संबंधित खात्याला वारंवार निवेदन देऊन या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. या अपघातक्षेत्र बनलेल्या रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
--जयप्रकाश तथा बाबा चव्हाण, सरपंच, हातदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

